Monday, June 23, 2025 12:50:42 PM

उड्डाण करण्यास नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सज्ज

व्यावसायिक उड्डाणांसाठी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आता सज्ज झाले आहे. त्यासाठी, अदानी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेडने इंडिगो या आघाडीच्या विमानसेवा कंपनीबरोबर बुधवारी करार केला आहे.

उड्डाण करण्यास नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सज्ज

नवी मुंबई: व्यावसायिक उड्डाणांसाठी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आता सज्ज झाले आहे. त्यासाठी, अदानी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेडने इंडिगो या आघाडीच्या विमानसेवा कंपनीबरोबर बुधवारी करार केला आहे. त्यामुळे नवी मुंबई विमानतळावरून व्यावसायिक उड्डाणे सुरू करणारी इंडिगो ही पहिली कंपनी ठरणार आहे.

'एनएमआयएवरून उड्डाण सुरू करणारी पहिली एअरलाइन भागीदार म्हणून इंडिगोची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे. ही भागीदारी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी ट्रान्सफर हब म्हणून एनएमआयएचे स्थान निश्चित करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे,' अशी माहिती अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण बन्सल यांनी दिली.

हेही वाचा: 'मयुरी हगवणे प्रकरणात पोलिसांवर कारवाई करा'; महिला आयोगाचे फडणवीसांना पत्र

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिल्या दिवसापासून 15 हून अधिक शहरांमध्ये दररोज 18 उड्डाणे करण्याचे इंडिगोचे मुख्य उद्दिष्ट आहे. इंडिगोच्या एका अधिकाऱ्याने अश्वासन दिले आहे की, 'नोव्हेंबर 2025 च्या सुरुवातीपर्यंत नवी मुंबई विमानतळावरून दररोज 79 उड्डाणे होतील आणि त्यापैकी 14 आंतरराष्ट्रीय असतील. तसेच, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 3,700 मीटर लांबीची धावपट्टी असेल. सोबतच, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दरवर्षी सुमारे 90 दशलक्ष प्रवासी आणि 3.2 दशलक्ष टन मालवाहतूक केली जाईल. यासह, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे येत्या महिनाभरात उद्घाटन करण्याची योजना आहे'.

अदानी ग्रुपचे आगामी प्रकल्प:

सध्या, अदानी ग्रुपकडे मुंबई, अहमदाबाद, लखनौ, मंगळुरू, जयपूर, गुवाहाटी आणि तिरुवनंतपुरम विमानतळ प्रकल्प आहेत. नवीन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पूर्ण झाल्यानंतर ते देखील यादीत समाविष्ट केले जाईल. दरम्यान, इंडिगोने 29 डिसेंबर 2024 रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांची पहिली चाचणी पूर्ण केली. हे विमानतळ डिसेंबर 2024 मध्ये सुरू होण्यास सज्ज होते, मात्र पायाभूत सुविधांच्या विलंबामुळे उशीर झाला.


सम्बन्धित सामग्री