राज्य शासनाकडून सुरू असलेल्या या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र महिलेला महिन्याला 1500 रुपये दिले जातात. योजनेची प्रचंड मोठी व्याप्ती पाहता, निधीचा तुटवडा भासू नये आणि हप्ते रखडू नयेत यासाठी सरकार विविध विभागांतील तरतुदींचे नियोजनबद्ध पुनर्गठन करत आहे. सामाजिक न्याय विभागाचा निधी वर्ग करणे हा त्याच आर्थिक नियोजनाचा एक भाग आहे. यामुळे आगामी सणासुदीच्या काळात राज्यातील महिलांना थेट आर्थिक पाठबळ मिळणार आहे. अशातच लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
महिनाभरापासून वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात सरकारकडून नवरात्रीआधी ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा झाल्याची माहिती समोर आली आहे. ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधन सणाचे औचित्य साधत लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता 1500 रुपये देण्यात आले. त्यानंतर संजय शिरसाट यांनी ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. ऑगस्ट महिन्याच्या हप्त्यासाठी सामाजिक न्याय विभागाने 339 कोटी रुपये वितरित केले आहेत. त्यामुळे लाडकी बहीण योजनेतील राज्यभरातील लाभार्थी महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा केले जात आहेत. यामुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
हेही वाचा- कामाची बातमी! FASTag नियमात मोठे बदल; तुमच्यावर काय परिणाम होणार?जाणून घ्या
महाराष्ट्रातील लाखो महिला ज्या आर्थिक मदतीची आतुरतेने वाट पाहत होत्या, त्यांच्यासाठी राज्य सरकारकडून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’अंतर्गत देण्यात येणारा दरमहा 1500 रुपयांचा सन्मान निधी आता अवघ्या काही वेळात पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात वर्ग केला जाणार आहे.
ऑगस्ट महिन्यातील या हप्त्याचे वितरण सुलभ आणि जलद व्हावे, यासाठी राज्य शासनाने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून तब्बल 339 कोटी 14 लाख रुपयांचा विशेष निधी महिला व बालविकास विभागाकडे हस्तांतरित करण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे आर्थिक प्रक्रियेला वेग आला असून, येत्या काही तासांतच पात्र महिलांच्या खात्यात थेट डीबीटी (DBT) द्वारे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.