आंबोली जंगलांमाधे जाऊन बॉंब स्फोटांची चाचणी

पुणे पोलिसांनी चार दिवसांपूर्वी इसीस या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेशी निगडीत दोन दहशतवाद्यांना ताब्यात घेतले होते. पुणे पोलिसांनी पकडलेल्या इसिसच्या दोन दहशतवाद्यांनी पुणे , सातारा आणि कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली जंगलांमाधे जाऊन बॉंब स्फोटांची चाचणी केल्याची कबुली पकडलेल्या दहशवादी यांनी दिल्याचे तपासात समोर आलंय . दहशतवादी जंगलात तंबू ठोकून काही दिवस राहिले देखील होते . […]

आंबोली जंगलांमाधे जाऊन बॉंब स्फोटांची चाचणी

पुणे पोलिसांनी चार दिवसांपूर्वी इसीस या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेशी निगडीत दोन दहशतवाद्यांना ताब्यात घेतले होते. पुणे पोलिसांनी पकडलेल्या इसिसच्या दोन दहशतवाद्यांनी पुणे , सातारा आणि कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली जंगलांमाधे जाऊन बॉंब स्फोटांची चाचणी केल्याची कबुली पकडलेल्या दहशवादी यांनी दिल्याचे तपासात समोर आलंय .

दहशतवादी जंगलात तंबू ठोकून काही दिवस राहिले देखील होते . त्यांच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दहशतवाद्यांनी आंबोलीच्या घनदाट जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी केली होती. त्यासाठी हे दहशतवादी तब्बल चार दिवस आंबोलीच्या जंगलात वास्तव्यास होते . या पार्श्वभूमीवर पुणे एटीएसच्या पथकाने आंबोलीच्या जंगलात येवून घटनास्थळाची पाहणी केली असे समजते. त्याठिकाणी काही महत्त्वाचे धागेदोरे या पथकाच्या हाती लागले आहेत, अशी माहिती पथकातील सूत्रांनी दिलीय. मात्र, या कारवाईबाबत एटीएसच्या अधिकाऱ्यांनी तपासात कमालीची गुप्तता बाळगली आहे. दोन्ही दहशतवाद्यांनी आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली जंगलात व कोल्हापूर व सातारा त्याठिकाणी बॉम्बस्फोटाच्या चाचणी केल्याची माहिती दहशवाद्यांदी यांनी सांगितले. बॉम्बस्फोटाच्या चाचणी करण्यासाठी पुण्यातून आंबोलीत आले होते असे समजते.

या दहशवाद्यांनी पुणे ते कोल्हापूर निपाणी आजरामार्गे आंबोली असा त्यांनी प्रवास केला. या प्रवासादरम्यान ते काही दिवस निपाणी व संकेश्वर येथे वास्तव्यास असल्याचे स्पष्ट केलीय. याबाबतही एटीएसच्या पथकाने वरील दोन्ही ठिकाणी या दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या व्यक्तींची चौकशी सुरु केली. तसेच दहशतवाद्यांच्या पुणे ते आंबोली दरम्यानच्या प्रवासाचे ठिकठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज एटीएसचे कर्मचारी गोळा करत आहेत. आंबोलीच्या जंगलात बॉम्बस्फोटाची भागातील जंगलातही बॉम्बस्फोटाची या पार्श्वभूमीवर एटीएसच्या अधिकाऱ्यांना चाचणी केल्याची कबुली त्यांनी जुलै रोजी पुणे एटीएसचे पथक याच्याकडे केली आहे.मात्र आता प्रश्न उपस्थितीत होतोय तो म्हणजे या बाबत स्थानिक पोलीस व सक्षम यत्रनेला कोणतीही माहिती नाही त्यामुळे आज ही जिल्ह्यातील सुरक्षा यत्रणेवरच प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number