गोकुळ दूध संघ निवडणुकीत सतेज पाटलांच्या पॅनलचे 13 उमेदवार विजयी! तर, महायुतीकडून या जागांवर फेरमतमोजणीची मागणी

कोल्हापूरच्या सहकार क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठा मानल्या गेलेल्या 'गोकुळ' दूध संघाच्या निवडणुकीचे निकाल आता समोर येऊ लागले आहेत. या अटीतटीच्या निवडणुकीत नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी पॅनलने दणदणीत मुसंडी मारली आहे.

गोकुळ दूध संघ निवडणुकीत सतेज पाटलांच्या पॅनलचे 13 उमेदवार विजयी! तर, महायुतीकडून या जागांवर फेरमतमोजणीची मागणी
gokul

Kolhapur Gokul Milk Union Election Result 2026: कोल्हापूरच्या सहकार क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठा मानल्या गेलेल्या ‘गोकुळ’ दूध संघाच्या निवडणुकीचे निकाल आता समोर येऊ लागले आहेत. या अटीतटीच्या निवडणुकीत नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी पॅनलने दणदणीत मुसंडी मारत तब्बल 13 जागांवर विजय मिळवला आहे. या निवडणुकीत शशिकांत पाटील-चुयेकर, किसन चौगुले, बाबासाहेब देवकर, विश्वजीत जाधव, राहुल देसाई, बाबासाहेब चौगुले, शशिकांत खोत, राजू आवळे, अंजना रेडेकर, भाग्यश्री डोंगळे आणि बयाजी शेळके यांच्यासह इतर उमेदवारांनी समविचारी आघाडीच्या पॅनलकडून विजय मिळवला आहे. या विजयामुळे सतेज पाटील यांच्या गटात आनंदाचे वातावरण पसरले असून गोकुळच्या राजकारणात हा एक मोठा बदल मानला जात आहे. तर, महायुतीसाठी हा एक अत्यंत मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.

महाडिक-मुश्रीफ पॅनलचे ‘हे’ उमेदवार विजयी
दुसरीकडे, महाडिक आणि मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या पॅनलकडूनही काही उमेदवार विजयी झाले असून, त्यात चेतन नरके, वीरेंद्र मंडलिक, राहुल पाटील, अमरीश घाडगे, अजित नरके, रणजीतसिंह के. पी. पाटील, रणजीतसिंह दिलीप पाटील, अजित पाटील परितेकर, युवराज पाटील, मदन देसाई आणि अमरसिंह पाटील यांचा समावेश आहे. अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीतील विजयानंतर दोन्ही आघाड्यांच्या समर्थकांकडून ठीकठिकाणी जल्लोष केला जात असून, गोकुळच्या सत्तेची समीकरणे आता नेमकी कशी जुळणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

महाडिक-मुश्रीफ पॅनल 9 जागांसह पिछाडीवर; नविद मुश्रीफ आणि शौमिका महाडिक पराभूत झाल्याची माहिती
सुरुवातीच्या कलांनुसार महायुतीचे नेतृत्व करणाऱ्या महाडिक-मुश्रीफ पॅनलला या निवडणुकीत मोठा फटका बसला असून त्यांचे केवळ 9 उमेदवार आघाडीवर आहेत. विशेष म्हणजे, या चुरशीच्या लढतीत नविद मुश्रीफ आणि शौमिका महाडिक यांच्यासारख्या प्रमुख चेहऱ्यांचा पराभव झाल्याचे समोर आले आहे. निकालातील या अनपेक्षित फेरबदलामुळे महायुतीच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले असून, पराभवाच्या छायेत असलेल्या महायुतीकडून आता फेरमतमोजणीची मागणी केली जात आहे.

हेही वाचा – ‘केजी टू पीजी शिक्षणासाठी 90 हजार कोटींची तरतूद…’; पुण्यात देवेंद्र फडणवीसांचा पदवीधर आणि शिक्षक मतदारांशी संवाद

कमी मतांच्या फरकामुळे फेरमतमोजणीची मागणी; सतेज पाटील मतमोजणी केंद्रावर दाखल
काही जागांवर विजयाचे अंतर अत्यंत अल्प असल्यामुळे महायुतीमधील उमेदवारांनी फेरमतमोजणीचा अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे मतमोजणी प्रक्रियेत पुन्हा एकदा रंगत निर्माण झाली असून, स्वतः सतेज पाटील हे एक मतदार प्रतिनिधी म्हणून मतमोजणी केंद्रावर दाखल झाले आहेत. फेरमतमोजणीनंतर अंतिम निकाल काय लागणार आणि गोकुळची सत्ता नेमकी कोणाच्या हातात जाणार, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number