कुडाळ तालुक्याला वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा, स्थानिकांचे मोठे नुकसान

कुडाळमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, दुकानांचे छप्पर उडाले, वीज सेवा ठप्प

कुडाळ तालुक्याला वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा, स्थानिकांचे मोठे नुकसान

कुडाळमध्ये काल वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले. या पावसामुळे स्थानिक नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले.हिर्लोक पंचक्रोशीत या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे.

वादळी वाऱ्यामुळे अनेक दुकानांचे छप्पर उडाले असून काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. त्यामुळे काही भागातील वीज सेवा बंद करावी लागली होती.

या बदलत्या वातावरणामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहेच, पण सर्वसामान्य नागरिकांनाही याचा फटका बसत आहे. मान्सूनचा परतीचा पाऊस गेल्यानंतर आलेल्या या अवकाळी पावसामुळे हवामानात मोठा बदल झाला असून त्याचा परिणाम आरोग्यावरही होत आहे.

दिवसा अति-उष्ण आणि रात्री दमट वातावरणामुळे मोठ्या प्रमाणावर व्हायरल ताप, सर्दी-खोकला अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यंदा राज्याचे हवामान पावसाच्या सुरुवातीपासूनच कोलमडले असून त्याचा सर्वांनाच फटका बसत आहे.

महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर-

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number