सिंधुदुर्ग: सावंतवाडीत एक हृदयद्रावक घटना घडली आहे. सावंतवाडी तालुक्यातील ओटवणे गवळीवाडीत मध्यरात्रीनंतर दोनच्या सुमारास दोन घरांवर वीज पडून वीजमीटरसहित वीज कनेक्शन जळून खाक झाले. घरातील इलेक्ट्रॉनिक्स वस्तूही निकामी झाल्या. विजेचा लोळ घरात घुसून भगदाड पडले, तर या धक्क्याने घरांच्या भिंतीला तडे गेले. विजेच्या या थरारात महिला सुदैवाने बचावली. मात्र, या घटनेत सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले.
हेही वाचा: पत्नीने केली पतीची कुऱ्हाडीने हत्या; दोन महिने शोषखड्ड्यात पुरून ठेवला मृतदेह
नेमकं प्रकरण काय?
शनिवारी रात्री, विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस सुरू होता. मध्यरात्रीच्या सुमारास, सुनीता बुरान घरात गाढ झोपेत असताना अचानक तिला मोठा आवाज ऐकू आला आणि विजेचा धक्का जाणवला. खबरदारी घेत, त्या ताबडतोब घराबाहेर पळत आल्या आणि मदतीसाठी ओरडू लागल्या. त्यांचा पुतण्या ताबडतोब घटनास्थळी पोहोचला आणि त्यांना धीर दिला.
या दुर्घटनेत त्यांच्या घराची भिंत कोसळली आणि वीजमीटरसहित वीज कनेक्शन जळून खाक झाले. घरातील इलेक्ट्रॉनिक्स वस्तूही निकामी झाल्या. विजेचा लोळ घरात घुसून भगदाड पडले, तर या धक्क्याने घरांच्या भिंतीला तडे गेले. तसेच, घरातील इतर वस्तूंचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अचानक घडलेल्या या घटनेळे सुनीता बुराण यांना प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. घटनेची माहिती मिळताच, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बुरान यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. 'शासनाने या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून सुनीता बुराण यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी', अशी मागणी केली आहे.