‘नियम पाळले नाही तर टाळेबंदी’ – दिलीप वळसे-पाटील

‘नियम पाळले नाही तर टाळेबंदी’ – दिलीप वळसे-पाटील

यंदाचे वर्ष सरत असताना नागरिक नव्या वर्षाच्या जल्लोषात स्वागत करण्याच्या तयारीत आहेत. तर दुसरीकडे राज्यात गेल्या काही दिवसांपासून ओमायक्रॉनसह पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे राज्य शासनाने नव वर्षासाठी नवी नियमावली जाहीर केली आहे. दरम्यान राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नागरिकांना टाळेबंदी लागण्याचा इशारा दिला आहे. नागरिकांना कोरोना नियम पाळले नाही तर टाळेबंदीशिवाय पर्याय उरणार नाही, असे राज्य गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

नागरिकांनी कोरोनाचे सर्व नियम पाळणे बंधनकारक आहे. नागरिकांना पार्टी करण्यासाठी पूर्ण वर्ष आहे मात्र सद्यपरिस्थिती लक्षात घेऊनच नव्या वर्षाचे स्वागत करण्याचे राज्याच्या गृहमंत्र्यांनी सांगितले आहे. कोरोना नियम न पाळणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याचे आदेश आम्ही पोलिसांना दिल्या आहेत. त्यामुळे जर नागरिकांनी नियम पाळले नाही, गर्दी टाळली नाही तर पोलिस त्या नागरिकांवर कारवाई करतील, त्यामुळे पोलिसांवर कारवाई  करण्याची वेळ आणू नका, असे राज्य गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले आहे.

नववर्षासाठी राज्य शासनाची नियमावली

  • नव्या वर्षाच्या स्वागातील नागरिकांनी घराबाहेर न पडता नववर्षाचे स्वागत घरीच साधेपणाने साजरे करावे.
  • राज्यात २५ डिसेंबरपासून रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यावर बंदी.
  • सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन करावे.
  • नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजिक करण्यात आलेल्या कार्यक्रमांना बंदिस्त सभागृहाच्या आसनक्षमतेच्या ५० टक्के पर्यंत असणार आहे.
  • खुल्या जागेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना उपलब्ध क्षमतेच्या २५ टक्के मर्यादेत उपस्थित राहण्यास परवानगी आहे.
  • नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारे धार्मिक/सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करु नये तसेच मिरवणुका काढण्यात येऊ नयेत.
  • कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ६० वर्षावरील नागरिकांनी व दहा वर्षाखालील मुलांनी सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या दृष्टीने शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे.
  • फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येऊ नये. ध्वनीप्रदूषणाच्या अनुषंगाने नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version