Wednesday, July 09, 2025 09:53:39 PM

एलपीजी गॅस सिलेंडर स्वस्त झाला; 1 जुलैपासून व्यावसायिक सिलेंडरमध्ये मोठी कपात

1 जुलैपासून व्यावसायिक एलपीजी सिलेंडर ₹58.50 ने स्वस्त झाला असून दिल्लीसह अन्य महानगरांमध्ये नवीन दर लागू. घरगुती सिलेंडरच्या दरात मात्र कोणताही बदल झालेला नाही.

एलपीजी गॅस सिलेंडर स्वस्त झाला 1 जुलैपासून व्यावसायिक सिलेंडरमध्ये मोठी कपात

मुंबई: जुलै महिन्याच्या सुरुवातीसच सामान्य नागरिकांसह व्यावसायिकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. तेल विपणन कंपन्यांनी (Oil Marketing Companies) एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरांमध्ये कपात केली असून, 19 किलो वजनाच्या व्यावसायिक सिलेंडरमध्ये तब्बल ₹58.50 ची घट करण्यात आली आहे. ही नवीन दररचना 1 जुलै 2025 पासून देशभरात लागू झाली आहे.

दर महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल कंपन्यांकडून एलपीजी सिलेंडरच्या किमतींचा आढावा घेऊन त्यामध्ये बदल केला जातो. यावेळी फक्त कॉमर्शियल गॅस सिलेंडरच्या दरात घट झाली आहे, तर 14 किलो वजनाच्या घरगुती सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.

हेही वाचा:NEET MDS 2025: राज्य कोट्यात प्रवेशासाठी CET कडून अर्जप्रक्रिया सुरू

दिल्ली, मुंबई, कोलकाता व चेन्नईतील नवीन दर (1 जुलै 2025 पासून) :

दिल्ली: ₹1723.50- ₹1665.00 (₹58.50 ची घट)

मुंबई: ₹1674.50- ₹1616.50 (₹58 ची घट)

कोलकाता: ₹1826.00- ₹1769.00 (₹57 ची घट)

चेन्नई: ₹1881.00-  ₹1823.50 (₹57.50 ची घट)

कोणाला होणार सर्वाधिक फायदा?

19  किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरचा वापर हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, ढाबे, केटरिंग सेवा आणि इतर व्यावसायिक संस्था मोठ्या प्रमाणात करतात. त्यामुळे यामधील दरकपातीचा थेट लाभ या क्षेत्रांतील उद्योजकांना मिळणार आहे. सलग दुसऱ्या महिन्यात व्यावसायिक सिलेंडरच्या दरात घट करण्यात आली आहे. जून 2025 मध्येही तेल कंपन्यांनी ₹24 पर्यंतची कपात केली होती.

एलपीजीच्या दरवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी दरमहा बाजारातील परिस्थिती, कच्च्या तेलाच्या किंमती आणि भारतीय रुपयाच्या मूल्याचा विचार करून तेल कंपन्यांकडून दर निश्चित केले जातात.

हेही वाचा:Happy Doctor's Day 2025: आजचा दिवस डॉक्टरांसाठी; त्यांना पाठवा 'या' खास शुभेच्छा, संदेश आणि प्रेरणादायी विचार

घरगुती ग्राहकांसाठी अद्याप दिलासा नाही

यावेळी घरगुती वापरासाठी वापरल्या जाणाऱ्या 14 किलोच्या सिलेंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे सामान्य घरगुती ग्राहकांना अजूनही दरकपातीसाठी वाट पाहावी लागणार आहे.

जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच व्यावसायिक वापरासाठी गॅस सिलेंडर स्वस्त झाल्याने व्यवसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र घरगुती ग्राहकांना याचे लाभ मिळण्यासाठी अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे.

 

 


सम्बन्धित सामग्री