महाराष्ट्रात मोठे प्रशासकीय फेरबदल; ‘या’ 3 वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांवर नवी जबाबदारी

सामान्य प्रशासन विभागाने (GAD) दिलेल्या माहितीनुसार, 1996 च्या बॅचचे आयएएस अधिकारी संजय खंदारे यांची अतिरिक्त मुख्य सचिव (वन विभाग) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात मोठे प्रशासकीय फेरबदल; ‘या’ 3 वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांवर नवी जबाबदारी
Maharashtra 3 IAS transfer Update

Maharashtra IAS Transfer: महाराष्ट्र सरकारने सोमवारी प्रशासकीय स्तरावर महत्त्वाचे फेरबदल करत 3 वरिष्ठ आयएएस (IAS) अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. सामान्य प्रशासन विभागाने (GAD) दिलेल्या माहितीनुसार, 1996 च्या बॅचचे आयएएस अधिकारी संजय खंदारे यांची अतिरिक्त मुख्य सचिव (वन विभाग) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. खंदारे हे यापूर्वी पर्यटन विभागात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत होते; आता त्यांच्याकडे मंत्रालयातील वन विभागाची धुरा सोपवण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या बदल्या

याच आदेशानुसार, 2009 च्या बॅचचे आयएएस अधिकारी संजय यादव यांची पर्यटन विभागाचे नवे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यादव हे यापूर्वी मुंबईत ‘समग्र शिक्षा अभियाना’चे राज्य प्रकल्प संचालक म्हणून जबाबदारी सांभाळत होते. याशिवाय 2019 च्या बॅचच्या महिला आयएएस अधिकारी वैष्णवी बी. यांची नागपूर विभागाच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशात 15 आयएएस आणि 23 पीसीएस अधिकाऱ्यांचे फेरबदल

दुसरीकडे, उत्तर प्रदेशातील योगी सरकारनेही प्रशासकीय यंत्रणेला गती देण्यासाठी 15 आयएएस आणि 23 पीसीएस (PCS) अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यात राकेश कुमार सिंग यांची ‘यूपी हाउसिंग अँड डेव्हलपमेंट बोर्ड’चे अतिरिक्त आयुक्त, तर नीरज शुक्ला यांची PCDF चे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती झाली आहे. तसेच डॉ. चंद्र भूषण यांची राम मनोहर लोहिया ॲकॅडमीच्या अतिरिक्त संचालकपदी आणि सचिन कुमार सिंग यांची वैद्यकीय शिक्षण विभागाचे विशेष सचिव म्हणून वर्णी लागली आहे.

उत्तर प्रदेशातील जिल्हास्तरीय प्रशासनात ध्रुव खडिया यांची मथुराचे सीडीओ (CDO) आणि नरेंद्र बहादूर सिंग यांची जौनपूरचे सीडीओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच श्रीहरी प्रताप शाही यांच्याकडे पंचायती राज संचालक, अमित कुमार सिंग यांच्याकडे PCDF चे व्यवस्थापकीय संचालक आणि माला श्रीवास्तव यांच्याकडे भूगर्भशास्त्र व खाणकाम विभागाच्या सचिव व संचालकपदाचा पदभार देण्यात आला आहे.

हेही वाचा – ‘सुधारित Form 6 ला मंजुरी दिलीच नाही’; SIR प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला दणका, सर्व रेकॉर्ड सादर करण्याचे आदेश

स्थानिक प्रशासनात नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती

राज्यभरातील 23 पीसीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये विविध जिल्ह्यांतील एडीएम (ADM) आणि एसडीएम (SDM) पदांचा समावेश आहे. चंद्रेश कुमार यांची देवरियाचे मुख्य महसूल अधिकारी, लावी त्रिपाठी यांची सहारनपूरचे एडीएम (प्रशासन) आणि राजेश कुमार यांची मेरठचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे. या प्रशासकीय बदलांमुळे दोन्ही राज्यांतील प्रशासकीय कामकाजाला अधिक गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number