मराठा क्रांती मोर्चानं पुकारलेल्या महाराष्ट्र बंद मुंबईत आहे की नाही यावरुन संभ्रम कायम आहे. कारण काल मोर्चाच्या समन्वयकांमध्ये मतभेद झाल्यानंतर काहींनी ठिय्या तर काहींनी बंदची भूमिका घेतलीये.
तर दुसरीकडे ठाणे आणि नवी मुंबईत मोर्चाच्या वतीने आज बंदची हाक देण्यात आलेली नसली तरी सकाळपासूनच दोन्ही तुरळक वाहतूक सुरू आहे.
स्कूल बसेस न चालवण्याचा निर्णय संघटनेनं घेतल्यानं मुंबई, ठाणे, नवी मुंबईत अनेक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलीये. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चौकाचौकात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.