Saturday, June 14, 2025 03:56:19 AM

Maharashtra Board SSC Result 2025: कोणताही क्लास न लावता दहावीत मिळाले 100 टक्के गुण

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावीचा निकाल जाहीर केला आहे. मंगळवारी  13 मे रोजी दहावीचा निकाल जाहीर झाला आहे.

maharashtra board ssc result 2025 कोणताही क्लास न लावता दहावीत मिळाले 100 टक्के गुण

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावीचा निकाल जाहीर केला आहे. मंगळवारी  13 मे रोजी दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. राज्यात दहावीचा निकाल  दुपारी 1 वाजता लागला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. पुण्यातील रावी नामजोशी हिने दहावीच्या परिक्षेत कौतुकास्पद कामगिरी केली आहे.

पुण्यातील रावी नामजोशीला दहावीत 100 टक्के गुण मिळाले आहेत. रावीने दहावीच्या परिक्षेत घवघवीत यश प्राप्त केले आहे. त्यामुळे गोळवलकर विद्यालयात रावीचं कौतुक होत आहे. दहावीच्या परिक्षेत 100 पैकी 100 गुण मिळाल्याने राज्यातून रावीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. रावीला दहावीत मिळाले यशामुळे तिच्या कुटुंबाला खूप आनंद झाला आहे. विशेष म्हणजे कोणताही क्लास न लावता रावीने यश संपादन केले आहे. रावीला 100 टक्के गुण मिळाले. यावर रावीचाही विश्वास बसत नाही. रावीला मिळालेल्या गुणांमुळे राज्यातून तिच्यावर स्तुती सुमनांचा वर्षाव होत आहे. 

हेही वाचा : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे लोकार्पण

दहावीला 90 ते 95 गुण मिळतील माहिती होतं. मात्र 100 टक्के गुण मिळतील याची अपेक्षा नव्हती अशी प्रतिक्रिया रावी नामजोशीने जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीला दिली. तसेच किती अभ्यास केल्यामुळे एवढे मार्क्स मिळाले असा प्रश्न विचारला. त्यावर किती अभ्यास केला यापेक्षा किती अभ्यास झाला हे महत्त्वाचे आहे असेही यावेळी रावीने सांगितले. रावीने कुठलाही क्लास न लावता 100 पैकी 100 गुण मिळवले आहेत. यात तिच्या शिक्षकांचं आणि शाळेच योगदान आहे. शाळेने मुलांकडून खूप अभ्यास करुन घेतल्यामुळे रावीला हे यश मिलाल्याचे रावीच्या आईने सांगितले. रावीने केलेल्या मेहनत आणि चिकटीमुळे तिला 100 टक्के गुण मिळाले. यात तिच्या शाळेचे आणि शिक्षकांचे मोठे योगदान असल्याची प्रतिक्रिया रावीच्या वडिलांनी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे.  


सम्बन्धित सामग्री