Uddhav Thackeray Emotional For Ajit Pawar : ‘मी माझा चांगला मित्र गमावला…’, अजित पवारांच्या आठवणीत भावूक झाले उद्धव ठाकरे

माणसे येतात जातात ती असताना त्यांचे महत्व कधी कळत नाही. नसल्यावर कळून काही उपयोग नसतो&quot. 

Uddhav Thackeray Emotional For Ajit Pawar : ‘मी माझा चांगला मित्र गमावला…’, अजित पवारांच्या आठवणीत भावूक झाले उद्धव ठाकरे

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे. अधिवेशनाच्या सुरूवातीलाच अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी नेत्यांनी अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच विधान भवनात शोकप्रस्तावदेखील मांडले गेले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोकप्रस्ताव मांडले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनीदेखील भावना व्यक्त केल्या. 

उद्धव ठाकरे म्हणाले की, "मी माझा चांगला मित्र गमावला. हिरीरिने काम करणारा नेता आता आपल्यात राहिला नाही. आपले वाटणारे अजित पवार आज दिसत नाही ही खंत आहे. माणसे येतात जातात ती असताना त्यांचे महत्व कधी कळत नाही. नसल्यावर कळून काही उपयोग नसतो". 

हेही वाचा – BMC Politics: विधीमंडळात संघर्ष, पण पालिकेत 'गळाभेट'; ठाकरेंच्या बड्या नेत्याचा मुलगा शिंदेंच्या आमदाराच्या भेटीला 

"माझ्या कारकिर्दीची सुरुवात अजित पवार यांच्या विचारधारेच्या विरोधातील होते. आम्ही कधी एकत्र येऊ असे वाटले नव्हते. दोन सकाळ होत्या त्यातील एक महाराष्ट्राला धक्का देणारी आणि एक चटका लावणारी".

हेही वाचा – Jitendra Awhad On Plain Crash: अजित पवारांचा विमान अपघात की 'नियोजित' घातपात? ब्लॅक बॉक्सवरून जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केले खळबळजनक सवाल 

"मला प्रशासकीय अनुभव नव्हता. सहकारी विरोधातील होते ते आहेत. अजित पवारांसारखा सहकारी एकतर त्यांनी धक्का दिलेला ते सोबत असणार.अजित पवारांसारखा मित्र मी गमावला. प्रशासकीय कामकाजातील कोणती गोष्ट कळला नाही तर त्यांच्याशी मी बोलायचो. काही लोक वृक्षाच्या सावलीत राहतात ओळख बनवतात काही कायम वृक्षासोबत असतात". 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number