Thursday, March 12, 2026 10:48:55 PM

Chhatrapati Sambhajinagar Crime: पैशासाठी वाट्टेल ते! आईवडिलांच्या निधनानंतर प्रॉपर्टीसाठी बहिणींनी भावासोबत केलं नको ते कृत्य, वाचा नेमकं काय घडलं?

छत्रपती संभाजीनगरमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. कुटुंबातील मालमत्तेच्या वादातून...

chhatrapati sambhajinagar crime पैशासाठी वाट्टेल ते आईवडिलांच्या निधनानंतर प्रॉपर्टीसाठी बहिणींनी भावासोबत केलं नको ते कृत्य वाचा नेमकं काय घडलं

मालमत्ता मिळवण्यासाठी आजकाल कोणीही कोणत्याही थराला जात आहे. कोणी कोणाचा जीव घेतं तर कोणी कोणाची फसवणूक करतं. छत्रपती संभाजीनगरमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. कुटुंबातील मालमत्तेच्या वादातून दोन सख्ख्या बहिणींनी भावाची जवळपास दोन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. 

समोर आलेल्या माहितीनुसार,  आजारी आईला विश्वासात घेऊन मृत्यूपत्रात फेरफार करणे आणि बँकेतील शेअर्ससह प्लॉट हडपल्याचा हा धक्कादायक प्रकार आता पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला आहे.सुनीता दिलीप लाहोटी रा. कोलकाता, पश्चिम बंगाल आणि  शोभना शरद टवानी रा. जयपूर, राजस्थान या दोन बहिणींची नावे आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून सातारा पोलीस आता अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा - Pune Crime : पुण्यात भर दुपारी थरार! स्पा सेंटरवर पोलिसांची धाड; पळून जाण्याच्या नादात तरूणीची इमारतीवरून उडी अन् क्षणात मृत्यू तर... 

मृत्युपत्रात फेरफार करणे, बँक आणि डी-मॅट खात्यांवरील नॉमिनी बदलणे तसेच प्लॉट विक्री करून रक्कम स्वतःकडे वळवणे असा प्रकार घडल्याची तक्रार सातारा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. एकूण व्यवहाराची रक्कम सुमारे 1 कोटी 95 लाख रुपयांहून अधिक असल्याचा दावा करण्यात आला असून, या संपूर्ण प्रकरणाचा तपास सातारा पोलिस करत आहेत.


सम्बन्धित सामग्री