पुण्यामधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुण्यातील विमाननगर परिसरात एका स्पा सेंटरमध्ये विचित्र प्रकार उघडकीस आला आहे. स्पा सेंटरवर पोलिसांची अचानक धाड पडली आहे. यावेळी घाबरलेल्या कर्मचाऱ्यांनी खिडकीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी इमारतीवरून पडून महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, पुण्यातील विमाननगर परिसरातील एका स्पा सेंटरवर पोलिसांनी स्पा सेंटरवर छापा टाकला आहे. यावेळी महिला कर्मचाऱ्याने आणि व्यवस्थापकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारल्याची धक्कादायक घटना रविवारी दुपारी घडली. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला असून व्यवस्थापक गंभीर जखमी झाला आहे.
हेही वाचा - Anil Ambani: अनिल अंबानींना उच्च न्यायालयाचा मोठा झटका; रिलायन्सच्या खात्यांवर 'फ्रॉड'चा ठपका कायम, सुप्रीम कोर्टात जाण्याचा मार्गही बंद
पोलिसांच्या माहितीनुसार, विमाननगर पोलिस स्टेशनच्या पथकाने दुपारी सुमारे तीनच्या सुमारास स्पा सेंटरवर कारवाई केली. अटकेच्या भीतीने महिला आणि व्यवस्थापकाने खिडकीतून उडी मारल्याचे सांगण्यात येत आहे. गंभीर जखमी अवस्थेत महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाला.
हेही वाचा - Electric Scooter : या कंपनीचं ग्राहकांना मोठं गिफ्ट! जुनी स्कूटर द्या आणि नवी घेऊन जा; नव्या टेक्नॉलॉजीसह मार्केटमध्ये पुनरागमन
संबंधित स्पा सेंटरमध्ये देहविक्रीचा बेकायदा व्यवसाय केला जात होता अशी पोलिसांना माहिती मिळाली. या प्रकरणी व्यवस्थापक व मालकाविरोधात अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेच्या मृत्यूप्रकरणी अपघाती मृत्यू म्हणून नोंद केली जात आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांनी दिली.