दुष्काळाने संसार उद्ध्वस्त केला; सर्वस्व पणाला लावलं, तरी कर्ज फिटेना… गावकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू

Buldhana News : बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात काळजाला चटका लावणारी घटना घडली आहे. चौंडी गावातील शंकर भारसाकडे या शेतकऱ्याने कर्जाच्या ओझ्याखाली गळफास घेऊन जीवन संपवलं आहे.

दुष्काळाने संसार उद्ध्वस्त केला; सर्वस्व पणाला लावलं, तरी कर्ज फिटेना… गावकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू
Buldhana Farmer Ends Life

बुलाढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातून शेतकरी आत्महत्येची दुर्दैवी घटना नुकतीच समोर आलेली आहे. चौंडी गावात वास्तव्यास असलेल्या शंकर भारसाकडे या शेतकऱ्याने गळफास घेत आपले जीवन संपवल्याची माहिती आहे. दुष्काळामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे.

शेतीमधून अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने कर्जाचा डोंगर वाढत गेला. संपूर्ण परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर त्यांनी आधीच शेतजमीन विकल्याची शिवाय काही जमीन गहाण ठेवल्याची ही माहिती समोर येत आहे. हे सर्व कर्ज फेडण्यासाठी पत्नीचे मंगळसूत्रही गहाण ठेवण्यात आल्याचे सांगितले जात आहेत. मात्र, एवढेच प्रयत्न करुनही कर्जाचा बोजा कमी झालेला नाही.

दुष्काळाच्या संकटामुळे शेती व्यवसायावर परिणाम होत असताना शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी या पुन्हा अधोरेखित झालेल्या आहेत. या चौंडी गावासह परिसरात प्रत्येकाकडून हळहळ व्यक्त होत असून शेतकरी कुटुंबाला तातडीने मदत मिळावी, अशी मागणी होत आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number