Wednesday, November 12, 2025 02:00:49 PM

Coldrif Cough Syrup Ban: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! कोल्ड्रिफ कफ सिरपच्या विक्री आणि वापरावर तात्काळ बंदी

मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये या सिरपचे सेवन केल्यानंतर अनेक मुलांचे मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर महाराष्ट्र सरकारने हा कठोर निर्णय घेतला आहे.

coldrif cough syrup ban महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय कोल्ड्रिफ कफ सिरपच्या विक्री आणि वापरावर तात्काळ बंदी

Coldrif Cough Syrup Ban: लहान मुलांच्या मृत्यूमुळे देशभरात खळबळ उडाल्यानंतर महाराष्ट्र सरकारनेही कोल्ड्रिफ कफ सिरप (बॅच क्रमांक SR-13) च्या विक्री, वितरण आणि वापरावर तातडीने बंदी घातली आहे. राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने रविवारी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, या सिरपचा कोणताही साठा तात्काळ जप्त करण्यात यावा. मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये या सिरपचे सेवन केल्यानंतर अनेक मुलांचे मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर महाराष्ट्र सरकारने हा कठोर निर्णय घेतला आहे. अन्न व औषध प्रशासनाने सर्व परवानाधारक औषध विक्रेत्यांना आणि सामान्य नागरिकांना सूचित केले आहे की, त्यांनी कोल्ड्रिफ सिरपची विक्री किंवा वापर त्वरित थांबवावा. तसेच, या उत्पादनाचा साठा आढळल्यास प्रशासनाला कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये मृत्यूची मालिका

मध्य प्रदेशात आतापर्यंत 14 मुलांचा, तर राजस्थानमध्ये 3 मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणानंतर दोन्ही राज्यांमध्ये या सिरपवर बंदी घालण्यात आली असून, उत्पादक कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मध्य प्रदेश पोलिसांनी एका डॉक्टरलाही अटक केली आहे. मृत्यूमुखी पडलेल्या मुलांच्या पालकांनी तक्रार केली की कोल्ड्रिफ सिरप घेतल्यानंतर मुलांना उलट्या, ताप आणि मूत्रपिंड निकामी होण्याची लक्षणे दिसली.

हेही वाचा - हिवाळी अधिवेशनाची तारीख ठरली ! अनेक मुद्द्यांवर होणार चर्चा

तपासात धक्कादायक खुलासा 

कांचीपुरम येथील सिरप उत्पादक कंपनीच्या तपासणीत 48.6 टक्के डायथिलीन ग्लायकोल आढळून आला आहे, जे अत्यंत विषारी रसायन आहे. याचे अनुमत मर्यादा फक्त 0.1 टक्के आहे. हे रसायन शरीरात गेल्यास मूत्रपिंड निकामी होणे, मज्जासंस्था बाधित होणे आणि मृत्यू होण्याची शक्यता वाढते.

हेही वाचा - Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची विरोधकांवर बोचरी टीका; म्हणाले, 'औरंगजेबांच्या विचारांचे समर्थन करणाऱ्यांना...'

या घटनेनंतर केंद्र सरकारनेही औषध नियामक प्राधिकरणाला सर्व बॅचेसची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. तज्ज्ञांच्या मते, ही घटना 2019 मधील गाम्बिया प्रकरणाची आठवण करून देते, ज्यात अशाच प्रकारच्या विषारी घटकांमुळे अनेक मुलांचा बळी गेला होता. दरम्यान, महाराष्ट्र सरकारने दिलेल्या या आदेशामुळे आता देशभरात औषधांच्या गुणवत्तेबाबत अधिक कडक कारवाई होण्याची शक्यता आहे.


सम्बन्धित सामग्री