दसरा की दिवाळी? लाडकी बहिणींच्या खात्यात 1500 येणार की 3,000? सणासुदीच्या तोंडावर मोठी अपडेट समोर

ऑगस्ट महिन्याची हप्त्याची रक्कम सप्टेंबरच्या अखेरीस पात्र महिलांच्या बँक खात्यावर हस्तांतरित करण्यात आली होती. मात्र, त्यानंतरचे सप्टेंबर आणि ऑक्टोबर या 2 महिन्यांचे हप्ते अद्याप बाकी आहेत.
दसरा की दिवाळी? लाडकी बहिणींच्या खात्यात 1500 येणार की 3,000? सणासुदीच्या तोंडावर मोठी अपडेट समोर
Ladki Bahin Yojana

महाराष्ट्र शासनाच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी ठरलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थी महिला सध्या आगामी हप्त्याच्या वितरणाची आतुरतेने वाट पाहत आहेत. ऑगस्ट महिन्याची हप्त्याची रक्कम सप्टेंबरच्या अखेरीस पात्र महिलांच्या बँक खात्यावर हस्तांतरित करण्यात आली होती. मात्र, त्यानंतरचे सप्टेंबर आणि ऑक्टोबर या 2 महिन्यांचे हप्ते अद्याप बाकी आहेत. त्यामुळे आगामी सणासुदीच्या काळात, म्हणजेच दसऱ्याच्या मुहूर्तावर महिलांना 1,500 रुपयांचा हप्ता मिळणार की थेट दिवाळीच्या तोंडावर दोन्ही महिन्यांचे मिळून एकत्रित 3,000 रुपये खात्यात जमा होणार, याविषयी संपूर्ण राज्यात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

आगामी मंत्रिमंडळ बैठकीत अंतिम निर्णयाची शक्यता

या थकबाकी आणि आगामी हप्त्यांच्या वितरणासंदर्भात पुढील आठवड्यात आयोजित राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर राज्य सरकारने केवळ सप्टेंबर महिन्याचा 1,500 रुपयांचा हप्ता देण्याचे निश्चित केले, तर दसऱ्यानंतर लगेचच यासंबंधीचा अधिकृत शासन निर्णय (GR) जारी केला जाईल. त्यानंतर 25 तारखेनंतर टप्प्याटप्प्याने ही रक्कम महिलांच्या खात्यात वर्ग करण्यास सुरुवात होईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. परंतु, ऑक्टोबरअखेरपर्यंत हे पैसे जमा झाले नाहीत, तर सप्टेंबर व ऑक्टोबर अशा दोन्ही महिन्यांची एकूण 3,000 रुपयांची मदत दिवाळीच्या सुरुवातीला म्हणजेच नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात महिलांच्या खात्यावर जमा केली जाऊ शकते, असा पर्यायही चर्चेत आहे.

हेही वाचा –  दसऱ्याआधी सोने-चांदीच्या दरात पुन्हा मोठी उसळी! जाणून घ्या, आजचे दर

राज्यभरातील 1.66 कोटी लाभार्थी महिलांना दिलासा मिळण्याची अपेक्षा

राज्यातील विविध भागांत ओल्या दुष्काळाचे सावट आणि आर्थिक आव्हाने असल्याने या मदतीचे महत्त्व अधिक वाढले आहे. सध्या महाराष्ट्रातील सुमारे 1,66,000,000 (1 कोटी 66 लाख) महिला या योजनेचा थेट लाभ घेत आहेत. तरीही, पुढील हप्ता नेमका कधी आणि किती स्वरूपात वितरीत केला जाणार, यावर राज्य शासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे आगामी मंत्रिमंडळ बैठकीत कोणता ठोस निर्णय घेतला जातो, याकडे राज्यभरातील लाखो लाडक्या बहिणींचे लक्ष लागले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version