महाराष्ट्र सरकारची लाडकी बहिण योजनेबद्दल महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. महिला आणि बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याची तारीख जाहीर केली आहे. लवकरच योजनेचे पैसे खात्यात जमा होणार आहेत. तसेच लाडक्या बहिणींच्या केवायसीबद्दलही तटकरे यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
समोर आलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे. याबद्दल आदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. यात त्यांनी म्हटले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस उद्या पासून सुरुवात होत आहे. लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे.
हेही वाचा - Ranjitsinh Naik Nimbalkar: रणजितसिंह निंबाळकरांचा दुग्धाभिषेक, कार्यकर्त्यांसमोर ढसाढसा रडले; साताऱ्यातील जाहीर पत्रकार परिषदेत काय घडलं?
महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे. ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर E-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व लाडक्या बहिणींनी 18 नोव्हेंबरचा आधी E-KYC प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती !
हेही वाचा - Success Story: स्टेशनरीचे दुकान चालवणाऱ्याचा मुलगा बनला सीए, मुकुंदचा प्रेरणादायी प्रवास
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांसाठी ई-केवायसी करणं आवश्यक करण्यात आलं आहे. ई केवायसी करत असताना महिलांना त्यांचा आधार क्रमांक आणि वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक द्यावा लागतो. ही केवायसी 18 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करावी लागणार आहे.