Friday, March 13, 2026 10:47:07 PM

Sugarcane Workers : लाखो उसतोड कामगारांवर सरकारची कृपा! सणासुदीला मिळणार खास भेट, प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय

स्थलांतरित स्वरूपात काम करणाऱ्या आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या कामगारांना मोठा आधार मिळणार आहे.

sugarcane workers  लाखो उसतोड कामगारांवर सरकारची कृपा सणासुदीला मिळणार खास भेट प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय

ऊसतोड कामगारांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे.  यासाठी प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील चार लाख नोंदणीकृत ऊसतोड कामगारांना मोफत शिधासंच आणि गृहोपयोगी वस्तूंचे संच देण्यास शासनाने मंजुरी मिळाली आहे. यामुळे आता स्थलांतरित स्वरूपात काम करणाऱ्या आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या कामगारांना मोठा आधार मिळणार आहे.

या जिल्ह्यांचा समावेश
या शिधासंच वाटप योजनेत बीडसह नाशिक, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, जळगाव, जालना, अहिल्यानगर आणि परभणी या दहा जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. वितरण प्रक्रिया पारदर्शक आणि वेळेत पूर्ण होण्यासाठी प्रशासनाला स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

हेही वाचा - BMC on Mumbai Parking : मुंबईतील वाढत्या पार्किंग समस्येवर महापालिका प्रशासनाचा मोठा निर्णय, जारी केल्या सूचना 

काय काय मिळणार शिधासंचात?
 शिधासंचात दोन किलो साखर, एक किलो खाद्यतेल, एक किलो चणा डाळ, एक किलो रवा, एक किलो मैदा आणि एक किलो पोहे यांचा समावेश असणार आहे. या शिधासंचाची अंदाजे किंमत सुमारे 610 रुपये इतकी आहे. याशिवाय चार लाख लाभार्थ्यांना गृहोपयोगी वस्तूंचा स्वतंत्र संच देण्यासही शासनाने मान्यता दिली आहे. 

हेही वाचा - Vikram Kale: 'शिक्षकांना कुत्रे मोजायची कामं लावता...'; विधान परिषदेत आमदार विक्रम काळे यांचा संताप

त्याचप्रमाणे शिधासंचाची वाटणी टप्प्या-टप्प्यात करण्यात येणार आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात चार लाख नोंदणीकृत ऊसतोड कामगारांपैकी एक लाख कामगारांना मोफत शिधासंच दिला जाणार आहे. उर्वरित तीन लाख कामगारांना पुढील टप्प्यांत लाभ देण्यात येईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. 


सम्बन्धित सामग्री