एसटी कर्मचाऱ्यांनी 13 ऑक्टोबरपासून आपल्या काही मागण्यांसाठी आंदोलनाचे बिगुल फुंकले. अशातच आता एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, एसटी कर्मचाऱ्यांच्या सप्टेंबर महिन्याच्या पगारासाठी काल राज्य शासनाने 471.05 कोटीचा निधी देण्यास मंजूरी मिळाली आहे.
सरकारच्या वतीने एसटी कर्मचाऱ्यांना वेळेत पगार व्हावा यासाठी 471.5 कोटी रूपयांचा निधी गृहविभागाकडून मंजूरी मिळाली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे सप्टेंबरचा पगार वेळेत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. एसटीच्या 83 हजार कर्मचाऱ्यांचे सप्टेंबरचे वेतन मिळणार आहे.
हेही वाचा - Mumbai OneTicket: पंतप्रधान मोदींनी लाँच केले ‘मुंबई वनटिकट’ अॅप! आता मुंबईत बस, ट्रेन आणि मेट्रोने प्रवास करणे सोपे होणार
याबद्दल एसटी महामंडळाने एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार ज्या कर्मचाऱ्यांची 12,500 रुपये उत्सव अग्रीम घेण्याची इच्छा आहे त्यांनी त्यांचे विभाग नियंत्रकांकडे अर्ज जमा करावेत. त्या अर्जाची तपासणी करुन पात्र कर्मचाऱ्यांची यादी 15 ऑक्टोबर 2025 पर्यंत या कार्यालयास पाठवावी असे आदेश देण्यात आले आहेत.
हेही वाचा - Double Decker Bus In Pune : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! तब्बल तीन दशकानंतर पुण्यात धावणार डबल डेकर बस
उत्सव अग्रीम म्हणजे रक्कम आगाऊ मिळण्यासाठी कमाल मूळ वेतन मर्यादा 43477 रूपये इतकी ठेवण्यात आली आहे.यापेक्षा जास्त आहे अशा कर्मचाऱ्यांना उत्सव अग्रीम मिळणार नाही असेही महामंडळाने स्पष्ट केले आहे. तसेच ज्या कर्मचाऱ्यांची सेवानिवत्ती अग्रीम वाटपापासून 10 महिन्यांच्या आत असेल अशा कर्मचाऱ्यांनी उत्सव अग्रीम अर्जाचा विचार करु नये असेही या पत्रकात म्हटले आहे.