Saturday, November 15, 2025 08:56:38 AM

Ladki Bahin Yojana : खुशखबर ! लाड्क्या बहिणींना दिवाळीचं गिफ्ट ; आदिती तटकरेंची मोठी घोषणा

पुढील 2 महिन्यांच्या आत सर्व लाडक्या बहिणींनी E-KYC प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती ! त्यामुळे लवकरच लाडक्या बहिणींना दिवाळीचं गिफ्ट मिळणार आहे.

ladki bahin yojana  खुशखबर  लाड्क्या बहिणींना दिवाळीचं गिफ्ट  आदिती तटकरेंची मोठी घोषणा
ladki bahin yojana

महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी आता सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. याबद्दलच आता महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात आजपासून रक्कम जमा करण्यात येणार आहे. याविषयीची घोषणा महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केली. 

आदिती तटकरे यांनी सोशल मिडियावर पोस्ट करत लिहिले की, "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस उद्या पासून सुरुवात होत आहे. लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे.

हेही वाचा - Governor Anandiben Patel: 'लिव्ह-इनमध्ये राहिलात, तर तुमचे 50 तुकडे होतील'; राज्यपाल आनंदीबेन पटेल यांचं वक्तव्य चर्चेत 

महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे. ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासूनhttps://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर E-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुढील 2 महिन्यांच्या आत सर्व लाडक्या बहिणींनी E-KYC प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती ! त्यामुळे लवकरच लाडक्या बहिणींना दिवाळीचं गिफ्ट मिळणार आहे. मात्र दोन महिन्यात E-KYC पूर्ण करावी लागणार आहे. 


सम्बन्धित सामग्री