Tuesday, March 17, 2026 03:00:46 PM

ZP Election results 2026 : जिल्हा परिषदेवर सत्ता कोणाची ? 10 वाजता होणार मतमोजणीला सुरुवात, अपडेट्स जाणून घ्या

यासाठी सकाळी 10 पासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

zp election results 2026  जिल्हा परिषदेवर सत्ता कोणाची  10 वाजता होणार मतमोजणीला सुरुवात अपडेट्स जाणून घ्या

राज्यभरात 7 फेब्रुवारीला  12 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या 125 पंचायत समित्यांसाठी मतदान पार पडले.  या  निवडणुकांचे निकाल आज, सोमवारी जाहीर होणार आहेत. यासाठी सकाळी 10 पासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे नेमकं काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

राज्यात एकूण 66.28 टक्के मतदान झाल्याची नोंद आहे. पुण्यात 68.35  टक्के मतदानाची नोंद झाली. राज्यातील एकूण 1 कोटी 41 लाख 90 हजार 211 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तसेच परभणी येथील 9 पंचायत समित्यांसाठी एकूण  74.89  टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने रविवारी दिली. 

हेही वाचा - Mahavistar AI App: शेतीत एआयची एंट्री! ‘महाविस्तार एआय’ ॲपमुळे शेतकऱ्यांच्या हातात डिजिटल ताकद 

त्याचप्रमाणे निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार, रत्नागिरी 55.79  टक्के, सिंधुदुर्ग 61.98 टक्के, पुणे 68.35 टक्के, सातारा 67.80 टक्के, सांगली 69.76 टक्के, सोलापूर 65.90 टक्के, कोल्हापूर 74.45 टक्के मतदान झाले. 

हेही वाचा - Weather Alert : राज्यात येत आहे दुहेरी संकट! IMD कडून पुढील 48 तासांसाठी अलर्ट जारी

त्याचप्रमाणे,  छत्रपती संभाजीनगर 72.69 टक्के, परभणी 74.89  टक्के, धाराशिव 65.22   टक्के आणि लातूर 63.79 टक्के याप्रमाणे मतदान झाले.सर्वांत कमी म्हणजे, 55.79  टक्के मतदान रत्नागिरी जिल्ह्यात झाले.
 


सम्बन्धित सामग्री