Monday, March 09, 2026 08:49:35 AM

Vijay Wadettiwar on Ladki Bahin Yojana : 'कर्जाचं खापर लाडक्या बहिणींवर फोडलं जातंय...', पत्रकार परिषदेदरम्याने विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

डावोसमध्ये जाऊन 30 लाख कोटींचे करार केले आहेत. आम्ही या संदर्भात व्हाइट पेपरची मागणी करणार आहोत.

vijay wadettiwar on ladki bahin yojana  कर्जाचं खापर लाडक्या बहिणींवर फोडलं जातंय पत्रकार परिषदेदरम्याने विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

अधिवेशनाच्या आदल्या दिवशी महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडली. या परिषदेदरम्याने  शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेस नेत्यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली. यावेळी विजय वडेट्टीवार यांनी लाडक्या बहिण योजनेचा विषय काढत विरोधकांवर निशाणा साधला आहे. 

यावेळी वडेट्टीवार म्हणाले की, "लाडक्या बहिणींमुळे कर्जबाजारी झालो असं भास्करराव बोलले.त्यामुळे बाकी योजनांना कात्री लावली. डावोसमध्ये जाऊन 30 लाख कोटींचे करार केले आहेत. आम्ही या संदर्भात व्हाइट पेपरची मागणी करणार आहोत.

हेही वाचा - Budget Session 2026: अधिवेशनापूर्वीच महाविकास आघाडी आक्रमक; चहापानावर बहिष्कार टाकत मांडला आरोपांचा पाढा

पुढे ते म्हणाले की, "महाराष्ट्रातील बहिणींना 1500 च्या ठिकाणी 3000 का देत नाही? एवढी मोठी गुंतवणूक येत आहे.  प्रचंड भ्रष्टाचार आहे.हे सर्व ढोंग आहे. महाराष्ट्र लुटला जातोय.  कमिशनखोरी सरळसरळ 20 ते 25 टक्क्यावर जात आहे. महाराष्ट्रात तर सर्व कामं मॅनेज करुन दिली जात आहेत. कुठल्याही कामात स्पर्धा होत नाहीय. सर्व कमिशन घेतली की कामं वाटली जातात",  असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.



सम्बन्धित सामग्री