महाराष्ट्रामध्ये पावसाने अक्षरश: थैमान घातले आहे. पावसाने अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. गावकऱ्यांना सुरक्षित ठीकाणी हलविण्यात आले आहे. मात्र मदत जाहिर करण्याऐवजी पंचनामे करण्यास सांगितले जात आहे. अशातच आमदार रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे.
त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, "अतिवृष्टीने राज्यात भयावह परिस्थिती निर्माण झाल्याने मायबाप सरकारला सांगायचंय, आज जाती-धर्मात वाद करण्यापेक्षा हिंदू, मुस्लिम, ओबीसी, एससी, एसटी या सर्वच समाजाचे शेतकरी अडचणीत आहेत. म्हणूनच राजकारण बाजूला ठेवून #माणुसकी_धर्माला आणि #महाराष्ट्र_धर्माला जागून शेतकऱ्याला तातडीने मदत करण्याची नितांत गरज आहे. आधी अवकाळी आणि आता अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं अक्षरशः कंबरडं मोडलंय. शेतीचं झालेलं नुकसान बघितलं तर शेतकऱ्यांना निकषापेक्षा कितीतरी जास्त मदत करण्याची गरज आहे.
हेही वाचा - Amravati News: 'पिकावर ट्रॅक्टर फिरवण्याचा कार्यक्रम...';शेतकऱ्याने प्रशासनालाच धाडलं नुकसानीचं निमंत्रणपत्र
आज हिंदू नाही तर बळीराजा खतरे में है..! अशा परिस्थितीत आता पंचनाम्याचा हट्ट न धरता आजच्या कॅबिनेट बैठकीत #ओला_दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 50 हजार रुपये मदतीची घोषणा करा आणि हीच #योग्य_वेळ असल्याने कर्जमाफीही जाहीर करा, ही आक्रोश करणाऱ्या बळीराजाच्यावतीने कळकळीची विनंती!
हेही वाचा - Maharashtra Rain Update : आभाळ फाटलं! अनेक जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढले, शाळांना सुट्टी जाहीर
रोहित पवारांच्या या पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.