Maharashtra Rain Update : आभाळ फाटलं! अनेक जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढले, शाळांना सुट्टी जाहीर

अनेक जिल्ह्यांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून शाळांना सुट्टी जाहिर करण्यात आली आहे. कोणत्या भागात कशी परिस्थिती आहे, याबद्दल जाणून घेऊया. 

Maharashtra Rain Update : आभाळ फाटलं! अनेक जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढले, शाळांना सुट्टी जाहीर

गेल्या काही दिवसांत पावसाने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना झोडपून काढले आहे. बीड, सोलापूर, बुलढाणा, अमरावतीमध्ये तुफान पाऊस झाला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून शाळांना सुट्टी जाहिर करण्यात आली आहे. कोणत्या भागात कशी परिस्थिती आहे, याबद्दल जाणून घेऊया. 

सोलापूर जिल्ह्यात झालेल्या व होत असलेल्या पावसामुळे तसेच भोगावती नदीतून सीना नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे सीना नदी वाहत असलेल्या भागात पुर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असल्याने सोलापूर जिल्ह्यातील माढा, करमाळा, मोहोळ, बार्शी आणि उत्तर सोलापूर ग्रामीण व  दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप मधील सर्व अंगणवाडी, शाळा महाविद्यालयांना प्रशासनाकडून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे कुमार आशीर्वाद जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी सुट्टीचा आदेश काढला आहे.

हेही वाचा – Maharashtra Rain Alert : सावधान! हवामान खात्याचा इशारा; राज्यातील 'या' जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

बुलढाणा जिल्ह्यामध्ये सिंदखेड राजा तालुक्यात प्रचंड पावसामुळे शेतकऱ्यांची अतोनात नुकसान केले आहे. सातत्याने होत असलेल्या ढगफुटीने शेतकऱ्यांच्या हाती आलेलं पीक पूर्णतः वाया गेला आहे शेतकऱ्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी साचलाने शेतीला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. अचानक आलेला ढगफुटी सदृश्य पावसाने शेतकऱ्यांच्या जनावरांचे देखील मोठे हाल झाले आहेत. अनेक ठिकाणी जनावर दगावले आहेत त्यामुळे आता शेतकऱ्यांना पंचनामे न करता सरसकट मदत जाहीर करावी अशी मागणी होऊ लागली आहे. 

हेही वाचा – Pod Taxi: मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा! मुंबईतील 'या' भागांत 'पॉड टॅक्सी' धावणार 

बीड जिल्ह्यात गेल्या तीन दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टर वरील शेती पिकांचे नुकसान झाले आहे.. अनेक ठिकाणच्या विहिरीमध्ये गाळ जमा झाला असून सिंचनाच्या साहित्याचे देखील नुकसान झाले आहे.. अशातच पुन्हा आकाशात काळे ढग जमा होत असल्याने शेतकऱ्यांना धडकी भरत आहे.. प्रशासन उपायोजना करत असले तरी नैसर्गिक आपत्ती पुढे त्या उपाययोजना तोकड्या ठरत आहेत..

मराठवाड्यामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे त्यामुळे मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात अतिवृष्टीचा पाऊस झाला आहे. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील भोकरवाडी शिवारांमधील शेतकऱ्यांचे शेती पिके पाण्याखाली आलेले आहे. काढण्यात आलेला सोयाबीन आता पाण्यात गेला आहे, चक्क सोयाबीनच्या शेतामध्ये गुडघ्या एवढ्या पाणी साचला असल्यामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीनला जागेवरतीच कोंब फुटू लागले आहे, तरीदेखील संबंधित विभागाचे अधिकारी या शेतकऱ्याच्या बांधावरती नुकसान पाहणी साठी पोहोचले नसल्याचा आरोप शेतकरी करत आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number