Saturday, March 07, 2026 02:51:18 AM

Jayant Patil on Ajit Pawar : 'भर सभेत दादांनी आबांना सुनावलं होतं...', जयंत पाटीलांनी सांगितल्या अजित पवारांबद्दलच्या राजकारणातील जुन्या आठवणी

अजित पवारांचे मानले जाणारे सर्वात जवळचे सहकारी जयंत पाटील यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

jayant patil on ajit pawar  भर सभेत दादांनी आबांना सुनावलं होतं  जयंत पाटीलांनी सांगितल्या अजित पवारांबद्दलच्या राजकारणातील जुन्या आठवणी

अजित पवारांच्या अकाली निधनाने अख्खा महाराष्ट्र हळहळला. 28 जानेवारीला दादांचं अपघाती निधन झालं. त्यांच्या मृत्यूवर शंकादेखील उपस्थित केल्या जात आहेत. अजित पवारांच्या मृत्यूने सर्वांना मोठा धक्का बसला. आज महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालं आहे. अधिवेशनाच्या सुरूवातीलाच अजित पवारांना श्रद्धांजली वाहण्यात आली. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे यांनी शोकप्रस्ताव मांडले. याचवेळी अजित पवारांचे मानले जाणारे सर्वात जवळचे सहकारी जयंत पाटील यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. महाराष्ट्राच्या राजकारणाला नजर लागली आणि दादांसारखा नेता आपल्यातून गेला. महाराष्ट्र राज्यात मोठ्या अपेक्षेने ज्यांच्याकडे बघितले जाते, त्यांनाच हिरावून घेण्याची नियतीची पद्धत आहे का? अशी शंका येते. विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे, आर. आर. पाटील आणि अजित दादा निघून गेले. आपण दादांसोबत गेल्या 35-40 वर्षांपासून काम केले आहे. 

हेही वाचा - Bhaskar Jadhav on Ajit Pawar Plane Crash : 'बारामतीत एक ठिणगी अन् महाराष्ट्र होरपळला असता', विधानभवनात शोक प्रस्तावादरम्याने भास्कर जाधवांचा मोठा खुलासा 

जे मनात येईल ते बोलायचे असा दादांचा स्वभाव होता.  एका जाहीर सभेत ते आर आर आबांना तंबाखू खाण्याच्या संदर्भात बोलले होते. दादा इतके बोलले की आबांना देखील कदाचित वाईट वाटले असेल. मी आबांच्या घरी जाऊन त्यांना म्हटलो की माझ्या व्यासपीठावरून दादा बोलले, मी माफी मागतो. पण, दादा बोलले ते काही चुकीचे नाही, हे देखील मी आबांना बोललो होतो. ज्याचं चुकलंय ते तोंडावर सांगायचं, असा दादांचा स्वभाव होता.

हेही वाचा - Shashikant Shinde On Ladaki Bahin Yojna : "दादांना श्रद्धांजली म्हणून आता या योजनेला..." चालू अधिवेशनात शशिकांत शिंदेंनी केली मोठी मागणी; नेमकं काय म्हणाले? 

 दादा जर आपल्यात असते तर कधी ना कधी महाराष्ट्राच्या प्रमुख पदावर बसले असते. मधल्या काळात त्यांच्या आणि माझ्या बैठका सात ते आठ वेळा झाल्या. त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड खुशी होते, हे मला नमूद करावंस वाटतंय. तू असशील मोठ्या बापाचा पण मी पण मोठ्या काकांचा आहे, अस ते एका भाषणात म्हणाले होते. यातून त्यांचं पवार साहेब यांच्यावरील प्रेम दिसून आलं, असे देखील जयंत पाटील म्हणाले.


सम्बन्धित सामग्री