Jitendra Awhad: …अन् जितेंद्र आव्हाडांची थेट घोड्यावरूनच महापालिकेत एन्ट्री, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनांचा नोंदवला निषेध

आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वात आज ठाण्यात आंदोलन करण्यात आलं.

Jitendra Awhad: …अन् जितेंद्र आव्हाडांची थेट घोड्यावरूनच महापालिकेत एन्ट्री, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनांचा नोंदवला निषेध

आखाती देशातील युद्धाचा फटका आता संपूर्ण जगामध्ये इंधन टंचाई निर्माण झाली आहे.  यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना इंधनाचा वापर कमी करावा असं आवाहन केलं आहे. वाहनांचा वापर कमी करावा, वर्क फ्रॉम होम करावं असंही ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या या आवाहनाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आक्रमक झाला आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वात आज ठाण्यात आंदोलन करण्यात आलं.

आंदोलनादरम्याने जितेंद्र आव्हाड यांनी चक्क घोड्यावर बसूनच एन्ट्री केली. यावेळी जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मोदी म्हणतात पेट्रोल डिझेल कमी वापरा करा. सत्ताधाऱ्यांनी आता टीएमटी बसचा वापर करावा अशा आशयाचा बॅनर घेत आंदोलनातून शरद पवार गटाने टोला लगावला आहे. आव्हाड यांनी घोड्यावर बसून ठाणे महानगरपालिकेत एन्ट्री केल्याचं पाहायला मिळालं. आयुक्त आणि महापौर उपमहापौर यांनी परिवहनचा प्रवास करावा असं आवाहन आव्हाड यांनी केलं. 

हेही वाचा – NEET Paper Leak Update: NEET पेपरफुटी प्रकरणात मोठा खुलासा; राजस्थानमधून नव्हे, तर महाराष्ट्रातून फुटला पेपर 

त्याचप्रमाणे, अंबानी आणि अदानी यांचा ताफा कमी होणार आहे का? असा सवाल देखील यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी केला. ते गाडीमधनं फिरणं बंद करणार आहेत का? असा सवालही आव्हाड यांनी केला. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number