भावाचा नाही तो गावाचा काय होणार? ज्यांनी स्वतःच्या रक्ताच्या भावाशी प्रतारणा केली, ते मुंबईच्या जनतेचे आणि मित्रांचे काय होणार? उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा आपलं ‘लहान मन’ दाखवून दिलं आहे. UT म्हणजे ‘Use and Throw’ उद्धव ठाकरेंच्या राजकारणाचं नवं समीकरण म्हणजे ‘Use and Throw’. गरज लागली की मनसेला वापरायचं आणि पदं वाटायची वेळ आली की त्यांच्या पाठीत खंजीर खुपसायचा, हीच उबाठा गटाची खरी प्रवृत्ती आहे.
गरज सरो आणि वैद्य मरो मुंबई महापालिकेत स्वार्थासाठी इतरांना जवळ करायचं आणि काम झालं की वाऱ्यावर सोडायचं, हा ‘गरज सरो आणि वैद्य मरो’ असा त्यांचा खाक्या आहे.राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीने पोटशूळ उठला आहे. एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची भेट झाली की मातोश्रीवर जळफळाट का सुरू होतो? ही भीती आगामी पराभवाची आहे का? असा सवालदेखील उपस्थित केला आहे.
शिंदे साहेब हे विरोधकांचीही कामं मार्गी लावतात, म्हणूनच आज संपूर्ण महाराष्ट्राने त्यांना ‘लोकनेता ते लोकनाथ’ म्हणून स्वीकारलं आहे.