राज्यात यावर्षी पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. अनेक भागांमध्ये पूराने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांकडून कर्जमाफीची मागणी केली जात आहेत. अशातच आता महायुतीच्या एका मंत्र्याने वादग्रस्त विधान केले आहे. यावरून आता शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत.
चोपडामध्ये बोलताना राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल बेताल वक्तव्य केले आहे. 'चोपडा पीपल्स को ऑप बँक' चे घोडगाव येथे शाखेच्या उद्घाटन निमित्त सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आले असते त्यावेळेस ते बोलत होते यावेळी माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराती, माजी मंत्री अनिल पाटील, माजी आमदार कैलास पाटील, दिलीपराव सोनवणे जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार यांच्यासह विविध पदावर असलेले राजकीय पदाधिकारी व गावातील नागरिक उपस्थित होते.
हेही वाचा - Ladki Bahin Yojana : खुशखबर ! लाड्क्या बहिणींना दिवाळीचं गिफ्ट ; आदिती तटकरेंची मोठी घोषणा
यावेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी म्हटले की, "लोकांना कर्जमाफीचा नाद लागलेला आहे. आम्हाला निवडून यायचे आहे. त्यामुळे आम्ही निवडणुकीत काहीतरी आश्वासन देतो. लोकांनी ठरवायचे काय मागायचे".
हेही वाचा - New Sand Policy: घर बांधकामाचा खर्च होणार कमी, वाळू धोरणात मोठा बदल, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
दरम्याने, अगोदरच अतिवृष्टीने शेतकरी हैराण आहेत. त्यात अतिवृष्टी मदतीचा शासनादेश काढला. त्यामध्ये अनेक अटी शर्ती टाकल्यामुळे व अनेक जिल्हे, गावे वगळल्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात संताप असल्याचे त्यांनी म्हटले. निवडणुकीत कर्जमाफीचे दिलेले आश्वासन न पाळल्यामुळे सुद्धा शेतकऱ्यांच्या मनात राग खदखदतो आहे. शेतकऱ्यांना डीवचणारी विधाने मंत्री करणार असतील तर उद्रेक होऊन परिस्थिती हाताबाहेर गेल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही डॉ. अजित नवले यांनी दिला.