Inflation: भाकरीचा घास महागणार! पुण्यात दळणाच्या किमतीत वाढ, सर्वसामान्य त्रस्त

पुणे शहर जिल्हा पीठ गिरणी मालक संघाने 1 जूनपासून दळणाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. 

Inflation: भाकरीचा घास महागणार! पुण्यात दळणाच्या किमतीत वाढ, सर्वसामान्य त्रस्त

आखाती देशातील युद्धाचा आता सर्वांनाच फटका बसत आहे. सुरूवातीला एलपीजी गॅसचा मोठ्या प्रमाणात तोटा निर्माण झाला. अशातच आता गृहीणींच्या चिंतेत अजून भर पडणार आहे. पुणे शहर जिल्हा पीठ गिरणी मालक संघाने 1 जूनपासून दळणाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. 

सध्या सर्वसाधारण दळणासाठी 8 रुपये प्रतिकिलो दर आकारला जात होता.मात्र आता  गहू, ज्वारी यांसारख्या धान्याच्या दळणासाठी आता प्रतिकिलो 10 रुपये मोजावे लागणार आहेत. तर डाळ, भाजणी आणि इतर पदार्थांच्या दळणासाठी प्रतिकिलो 15 रुपये आकारले जाणार आहेत.

हेही वाचा – Nirmala Sitharaman: मध्यपूर्वेतील तणावाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम? अर्थमंत्र्यांचे तेल आणि सोन्याच्या किमतींबाबत महत्त्वपूर्ण विधान 

वाढती महागाई, गिरणीसाठी लागणाऱ्या सुट्या साहित्यांच्या वाढलेल्या किमती, वीजबिलाचा वाढता भार आणि गिरणी कामगारांच्या पगारवाढीच्या मागण्यांमुळे हा निर्णय घ्यावा लागल्याचे पुणे शहर जिल्हा पीठ गिरणी मालक संघाचे अध्यक्ष लुईस सांगळे यांनी सांगितले.  

हेही वाचा – Twisha Sharma Case: 'ट्विशाचा मृत्यू दुर्दैवी…'; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण; मीडियाला दिले 'हे' कडक निर्देश

दळणाचे दर फक्त दोन ते पाच रुपयांनी वाढल्यासारखे वाटत असले तरी एका मध्यमवर्गीय कुटुंबात महिन्यातून तीन ते चार वेळा 10 ते 15 किलो धान्य दळले जाते. त्यामुळे महिन्याचा अतिरिक्त खर्च लक्षणीय वाढणार आहे.   या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी वाढणार असून, येत्या काळात इतर जीवनावश्यक सेवांच्या दरवाढीचीही भीती व्यक्त केली जात आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number