राज्यात ‘ऑक्टोबर हिट’चा पारा 38 अंशांवर; सोमवारी हवामानात होणार मोठा बदल; IMD कडून नवा इशारा जारी

वाढत्या उन्हामुळे काही जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा थेट 38 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
राज्यात ‘ऑक्टोबर हिट’चा पारा 38 अंशांवर; सोमवारी हवामानात होणार मोठा बदल; IMD कडून नवा इशारा जारी
Maharashtra weather update

महाराष्ट्रातून परतीचा पाऊस ओसरल्यानंतर आता राज्यभरात ऑक्टोबर महिन्यातील कडक उन्हाचा म्हणजेच ‘ऑक्टोबर हिट’चा तडाखा तीव्र झाला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, येत्या 12 ऑक्टोबर रोजी राज्यातील बहुतांश भागांत हवामान पूर्णपणे कोरडे राहण्याची शक्यता आहे. वाढत्या उन्हामुळे काही जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा थेट 38 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकण किनारपट्टीवरील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सर्वच जिल्ह्यांत पावसाची शक्यता नसून हवामान शुष्क आणि दमट राहील. या काळात मुंबईचे कमाल तापमान 25 ते 36 अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदवले जाऊ शकते.

उत्तर, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उन्हाचा चटका कायम

दरम्यान, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांसह नाशिकच्या घाटमाथ्यावर पावसाने पूर्ण विश्रांती घेतली आहे. नाशिक शहरात तापमान 20 ते 35 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज असून अहिल्यानगरमध्येही कडक ऊन राहील. दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांमध्येही उन्हाचा चटका वाढणार आहे. पुण्यातील तापमान 22 ते 36 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता असून सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावरही ढगांची उपस्थिती असणार नाही.

याशिवाय मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर या 8 ही जिल्ह्यांत कोरडे हवामान राहून उन्हाची तीव्रता अधिक जाणवेल. छत्रपती संभाजीनगरमध्ये तापमान 20 ते 36 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा –  मुंबई महामार्गावर अपघातांची मालिका! सलग दुसऱ्या दुर्घटनेने खळबळ, दोन्ही चालक गंभीर

विदर्भात अकोला-अमरावतीत पारा 38 अंशांवर

तथापी, विदर्भातील सर्व 11 जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने कोणताही पावसाचा इशारा दिलेला नाही. या भागात अकोला आणि अमरावती येथे तापमान 22 ते 38 अंश सेल्सिअसच्या उच्चांकी पातळीवर पोहोचू शकते. सतत वाढणाऱ्या उष्णतेमुळे नागरिकांना डिहायड्रेशन आणि थकवा जाणवण्याचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर दुपारच्या वेळी विनाकारण कडक उन्हात बाहेर पडणे टाळावे, शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी जास्तीत जास्त पाणी व द्रव पदार्थांचे सेवन करावे, बाहेर पडताना सुती व हलक्या रंगाचे कपडे वापरावेत तसेच उष्णतेचा त्रास झाल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन आरोग्य यंत्रणेकडून करण्यात आले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version