Saturday, March 07, 2026 05:13:48 AM

Devendra Fadnavis: विजयाचा गुलाल उधळताच फडणवीस तडकाफडकी दिल्लीला रवाना; अमित शाह यांच्या भेटीत 'या' मोठ्या निर्णयावर शिक्कामोर्तब?

ग्रामीण भागात मिळालेल्या या यशानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर गेले असून, आगामी राजकीय घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

devendra fadnavis विजयाचा गुलाल उधळताच फडणवीस तडकाफडकी दिल्लीला रवाना अमित शाह यांच्या भेटीत या मोठ्या निर्णयावर शिक्कामोर्तब

मुंबई: राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाले असून, ग्रामीण महाराष्ट्राने पुन्हा एकदा महायुती आणि भारतीय जनता पक्षावर विश्वासाची मोहोर उमटवली आहे. 'शहरी पक्ष' ही ओळख पुसून काढत भाजपने खऱ्या अर्थाने गावगाड्यावर वर्चस्व प्रस्थापित केले आहे. 12 पैकी तब्बल 11 जिल्हा परिषदांमध्ये महायुतीचा झेंडा फडकला असून, पंचायत समित्यांमध्येही भाजपने 55 जागा जिंकत मुसंडी मारली आहे. या 'शानदार' विजयाचा जल्लोष सुरू असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तडकाफडकी दिल्ली दौऱ्यावर गेल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

अजितदादांच्या निधनानंतरची राजकीय समीकरणे

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र एका मोठ्या धक्क्यातून सावरत आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाल्यानंतर राज्यातील राजकारणाची दिशाच बदलली आहे. त्यांच्या निधनामुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी राजकीय रणनीती आखली जात आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाचे वारे वाहत असतानाच फडणवीस यांचा हा दिल्ली दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

हेही वाचा: 'या' बॅंकेचं ग्राहकांना मोठं गिफ्ट! व्याजदरांमध्ये कपात, आता EMI होणार अधिक स्वस्त

विजयाचे 'मिथक' तोडले; मुख्यमंत्र्यांचे ग्रामीण राजकारणावर भाष्य

निवडणुकीच्या निकालावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार प्रहार केला. ते म्हणाले, "2014 मध्ये आम्ही जे मिथक तोडले होते की भाजप केवळ शहरी पक्ष आहे, ते 2017 आणि 2019 मध्ये अधोरेखित झाले. मात्र, 2026 च्या या निकालांनी हे पूर्णपणे प्रस्थापित केले आहे की, भाजप आता ग्रामीण भागातही नंबर एकचा पक्ष आहे." ग्रामीण भागातील मतदारांनी दिलेला हा कौल म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारच्या विकासकामांची पावती असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

पंतप्रधान मोदींच्या 'ग्रामविकास' मंत्राचा प्रभाव

या विजयाचे श्रेय मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीला दिले आहे. ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांसाठी केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला, ज्यामुळे खेड्यापाड्यांत सकारात्मक वातावरण निर्माण झाले. महाराष्ट्रातील महायुती सरकारनेही या योजनांची प्रभावी अंमलबजावणी केल्याने जनतेच्या मनात विश्वासाचे नाते घट्ट झाले आहे. 'गावगाड्याचा विकास, हाच आमचा ध्यास' ही घोषणा प्रत्यक्षात उतरल्याचे चित्र निकालातून दिसत आहे.

दिल्ली दौऱ्याचे गुपित काय?

मुख्यमंत्र्यांच्या या दिल्ली दौऱ्याचे नेमके कारण अद्याप गुलदस्त्यात असले, तरी ते गृहमंत्री अमित शाह आणि पक्षश्रेष्ठींची भेट घेणार आहेत. राज्यात होणारे मंत्रिमंडळ विस्तार, इतर राजकीय पेच आणि आगामी राजकीय रणनीती यावर या भेटीत खलबते होण्याची शक्यता आहे. विजयाचा अहवाल सादर करण्यासोबतच राज्यातील नव्या समीकरणांवर शिक्कामोर्तब करण्यासाठी फडणवीस यांची ही 'दिल्ली वारी' महत्त्वाची असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा: T20 World Cup 2026 IND vs PAK: पाकिस्तानने शरणागती पत्करली! पीसीबीची अट फेटाळत भारत-पाकिस्तान सामन्याबाबत आयसीसीने घेतला मोठा निर्णय


सम्बन्धित सामग्री