“आमच्या कामाचे श्रेय तटकरे घेतात” शिवसेना-राष्ट्रवादीत पुन्हा जुंपली; शिंदेसेनेतील नेत्याचा तटकरेंना सबुरीचा सल्ला

गेल्या काही दिवसापासून रायगड जिल्ह्यात महायुतीत ठिणगी पडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. शिवसेना एकनाथ शिंदे गटातील महेंद्र दळवी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे या नेत्यांमध्ये सातत्यानं कुरबुरी सुरु असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

“आमच्या कामाचे श्रेय तटकरे घेतात” शिवसेना-राष्ट्रवादीत पुन्हा जुंपली; शिंदेसेनेतील नेत्याचा तटकरेंना सबुरीचा सल्ला
Mahendra Dalvi On Sunil Tatkare

गेल्या काही दिवसापासून रायगड जिल्ह्यात महायुतीत ठिणगी पडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. शिवसेना एकनाथ शिंदे गटातील महेंद्र दळवी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे या नेत्यांमध्ये सातत्यानं कुरबुरी सुरु असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दोन्ही पक्षाचे नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत.

शिवसेना शिंदे गटचे आमदार महेंद्र दळवी आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटचे नेते सुनील तटकरे यांच्यामधील वाद अलीकडच्या काळात चांगलाच तापला आहे. अशातच रायगडमधील विकासकामांच्या श्रेयावरून एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा जुंपली पाहायला मिळते आहे.

हेही वाचा- “शिक्षक संघटनाशी बोलून पुढील निर्णय घेणार” पुणे शिक्षक मतदारसंघात नवा ट्विस्ट; सानप यांचं ठरलं, महायुतीत मोठ्या घडामोडी

रोह्यातील शाळेच्या दुरुस्तीच्या कामावरून आमदार महेंद्र दळवी यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आमच्या कामाचं श्रेय तटकरे घेतात, एवढंच नाही तर उद्घाटनालाही आम्हाला बोलावलं नाही, अशी खंत दळवींनी व्यक्त केली.

तटकरे यांना नेहमीच घाई असते, त्यांनी सबुरी ठेवावी, असा खोचक सल्लाही महेंद्र दळवी यांनी सुनील तटकरे यांना दिला आहे. रोह्यातच सीएसआर निधीचा वापर का होतो, असा सवाल करत दळवींनी तटकरेंवर आणखी एक निशाणा साधला आहे. दरम्यान महेंद्र दळवी यांनी केलेल्या आरोपांवर आता सुनील तटकरे काय प्रत्युत्तर देतात हे पाहण महत्त्वाचं ठरणार आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number