Wednesday, July 09, 2025 08:52:25 PM

सिंदखेडराजामधील अनेक ऐतिहासिक मूर्ती कचऱ्यात; शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट

बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे माँ जिजाऊ यांचे जन्मस्थान आहे. मात्र, याच सिंदखेडराजा येथे पुरातन वस्तूंची मोठी हेडसांड होत आहे.

सिंदखेडराजामधील अनेक ऐतिहासिक मूर्ती कचऱ्यात शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट

प्रफुल खंडारे. प्रतिनिधी. बुलढाणा: बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे माँ जिजाऊ यांचे जन्मस्थान आहे. मात्र, याच सिंदखेडराजा येथे पुरातन वस्तूंची मोठी हेडसांड होत आहे. त्यामुळे, स्थानिकांकडून पुरातन विभागावर रोष व्यक्त करत आहेत. 

हेही वाचा: रुपाली गांगुलीच्या 'अनुपमा' शोच्या सेटवर भीषण आग; कोट्यवधींचा माल जळून खाक

एकेकाळी या ऐतिहासिक ठिकाणी राजे लखुजीराव जाधव वास्तव्यास होते. तसेच, या ठिकाणी माँ जिजाऊ यांचा जन्म झाला होता. त्यामुळे या परिसराला विशेष महत्व लाभले आहे. मात्र या परिसरात असलेल्या कचऱ्याच्या साठ्यात अनेक ऐतिहासिक मूर्ती पडलेल्या आढळून आल्या आहेत. त्या मूर्ती खूप मौल्यवान आहेत आणि पुरातत्व विभागाने त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे, आता शिव प्रेमींमध्ये संतापाची लाट पहावयास मिळत आहे. 'ज्या ऐतिहासिक ठिकाणी माँ जिजाऊ यांचा जन्म झाला, तेथील अनेक ऐतिहासिक मूर्ती कचऱ्याच्या ढिगाऱ्यात असतील तर याला काय म्हणावं? असा प्रश्न तेथील रहिवाशांना तसेच शिवप्रेमींना पडला आहे. त्यामुळे आता कचऱ्याच्या ढीगाऱ्यात टाकलेल्या मूर्तींचे जतन करण्याची आणि या सर्व गंभीर बाबींना जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.


सम्बन्धित सामग्री