पुण्यात म्हाडाच्या घरांसाठी अर्ज केला?, 4462 घरांच्या सोडतीबाबत समोर आली महत्त्वाची अपडेट; जाणून घ्या लगेच

MHADA Pune Lottery 2026 : म्हाडाच्या पुणे मंडळाच्या घरांच्या सोडतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू असून 15 ऑक्टोबर रोजी अर्ज करण्याची मुदत संपणार आहे. मात्र, अर्जदारांना दिलासा मिळण्याची शक्यता असून एक मोठी अपडेट समोर आलेली आहे.

पुण्यात म्हाडाच्या घरांसाठी अर्ज केला?, 4462 घरांच्या सोडतीबाबत समोर आली महत्त्वाची अपडेट; जाणून घ्या लगेच
Pune MHADA Lottery News

पुण्यासारख्या प्रमुख शहरात स्वत:चं घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. म्हाडा पुणे मंडळाच्या तब्बल 4462 घरांच्या सोडतीसाठी सुरु असलेल्या अर्ज प्रक्रियेबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. याच निर्णयामुळे इच्छुक अर्जदारांना नेमका काय फायदा होणार आहे, जाणून घ्या सविस्तर.

अर्जदारांसाठी काय बदलणार
मिळालेल्या माहितीनुसार, नोंदणी आणि अर्जस्वीकृतीची प्रक्रिया ही येत्या 15 ऑक्टोबर रोजी संपणार होती. मात्र, अर्ज भरताना येणाऱ्या काही तांत्रिक अडचणींमुळेच ही प्रक्रिया आता पुढे जाण्याची चिन्हे आहेत. महाआयटीत्या प्रणालीत बिघाड झाल्याने उत्पन्नाचा दाखला तसेच अधिवास प्रमाणपत्रक आणि अन्य काही कागदपत्रांची पडताळणी रखडली आहे. त्यामुळे हजारो अर्जदारांचे अर्ज हे अजूनही अपूर्णच आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे मंडळाने ही प्रक्रिया आणखी 7 दिवस वाढण्याचा प्रस्ताव म्हाडा उपाध्यक्षांकडे पाठवला आहे.

हेही वाचा-परिवहन मंत्र्यांचा मोठा निर्यण! महाराष्ट्रात पहिल्यांदाच एअर अ‍ॅम्ब्युलन्सची सुविधा; ‘या’ महामार्गांवर सेवा होणार उपलब्ध

25 नोव्हेंबरची सोडत पुढे ढकलणार?
लवकरच या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता मिळण्याची शक्यता असून, मंजुरीनंतरच नवे वेळापत्रक जाहीर केले जाईल. अशी माहिती मिळत आहे. पुणे मंडाळाला 15 टक्के एकात्मिक योजनेतून 1491 घरे आणि 20 टक्के सर्वसमावेशक योजनेतून 2971 इतकी घरे असे एकूण 4463 घरे प्राप्त झालेली आहे.

या घरांसाठी ऑगस्टमध्ये जाहिरात निघाली होती. यापूर्वही दोनदा ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे, आता तिसऱ्यांदा ही मुदतवाढ मिळणार आहे. दरम्यान, मुदतवाढ मिळाल्यानंतर 25 नोव्हेंबरला होणारी सोडत पुढे ढकलली जाईल. अर्जदारांचे लक्ष आता नव्या तारखेकडे लागले आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number