मोठी बातमी! राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे शेतकऱ्यांचं लक्ष; कोणत्या प्रश्नांवर होणार चर्चा?

Maharashtra Cabinet Meeting Today : राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे.

मोठी बातमी! राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे शेतकऱ्यांचं लक्ष; कोणत्या प्रश्नांवर होणार चर्चा?
Maharashtra Cabinet Meeting Today

राज्य मंत्रिमंडळाची आज साप्ताहिक बैठक पार पडणार आहे. सकाळी 10.30 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित राहणार आहेत. आजच्या बैठकीत प्रामुख्याने राज्यातील दुष्काशी परिस्थितीवर चर्चा होणार आहे. ज्यात पाणीटंचाई, चारा नियोजन, खत पुरवठा या तीन महत्त्वाच्या मुद्द्यांवर सरकार विशेष लक्ष देणार आहे.

दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी बरेच महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. याच दरम्यान, आजच्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार का, याकडे ही सर्वांचे लक्षा लागले आहे. राजकीय वर्तुळात यावरुन अनेक चर्चा सुरु आहेत. साधारणपणे कॅबिनेट बैठक ही दर मंगळवारी होते. मात्र, काही कारणांमुळे यावेळी ती आज घेण्यात येत आहे. बैठकीत काय निर्णय होणार याकडे ही राज्याचे लक्ष लागले आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number