मुंबई: 28 जून 2024 रोजी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू झाली होती. यादरम्यान, अनेक महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा होऊ लागले. अशातच, 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'अंतर्गत महिलांच्या खात्यात 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये जमा करण्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले होते. मात्र ते अद्याप पूर्ण झाले नाही, त्यामुळे महिलांमध्ये नाराजीचे सुर उमटत आहे. राज्य सरकारने मार्च 2024 नंतर महिलांच्या खात्यात 2100 रुपये जमा होणार, असे म्हटले होते. मात्र अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही.
आता लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना आता ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे. माध्यमांशी संवाद साधताना महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मंगळवारी घोषणा केली की, 'ई-केवायसीच्या प्रक्रियेसाठी अजून 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे'. लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून वार्षिक उत्पन्न दोन लाखांपेक्षा अधिक असलेल्या महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. हे लक्षात घेता, राज्य सरकार आता ई-केवायसीच्या माध्यमातून अशा लाभार्थींची तपासणी करणार आहे. त्यामुळे, आणखी 70 लाख महिला अपात्र ठरू शकतात, अशी शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.
महिला आणि बालकल्याण अधिकारी प्रसाद मिरकले म्हणाले की, 'योजनेच्या वेबसाइटवरील ई-केवायसी प्रक्रियेतील तांत्रिक अडचणी, विशेषतः OTP संबंधीच्या समस्या आता दूर झाल्या आहेत. महिला व बालविकास विभागाने यावर तोडगा काढला असून, आता ई-केवायसी प्रक्रिया सुरळीतपणे पूर्ण करता येईल. ही प्रक्रिया पूर्ण करणे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक आहे'.
हेही वाचा: Mumbai Diwali Pollution: मुंबईनगरी झाली धूसर; दिवाळीच्या फटाक्यांमुळे मुंबईत वाढले प्रदूषण; हवेची गुणवत्ता ‘खराब’ श्रेणीत
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कधीपासून सुरू झाली?
28 जून 2024 रोजी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू झाली होती. जुलैपासून लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर तब्बल 2 कोटी 56 लाख महिलांनी अर्ज केले. मात्र, सहा महिन्यानंतर या योजनेच्या पात्रतेची सुरू करण्यात आली. मात्र, तपासात असे आढळून आले की, चारचाकी असलेल्या, सरकारी सेवेत असलेल्या आणि एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिला या योजनेचा लाभ घेत आहेत, त्यामुळे 45 लाखांहून अधिक महिलांना लाभ मिळालेला नाही.