Tuesday, November 11, 2025 10:11:10 PM

Mira Bhayandar Marathi Language Insult: भाईंदर मध्ये छटपूजेच्या मीटिंग दरम्यान मराठी भाषेचा अपमान; मराठमोळे आयपीएस अधिकारी चव्हाण यांनी हिंदीतच बोलण्याचा धरला अट्टाहास

मीरा-भाईंदरमध्ये छठ बैठकीदरम्यान मराठी भाषेऐवजी हिंदी वापरल्याचा आरोप डिकॅप यांच्यावर झाला आहे. मराठी संघटनांचा संताप व्यक्त केला आहे. तक्रारींसह कारवाईची मागणी वाढली आहे.

mira bhayandar marathi language insult भाईंदर मध्ये छटपूजेच्या मीटिंग दरम्यान मराठी भाषेचा अपमान मराठमोळे आयपीएस अधिकारी चव्हाण यांनी हिंदीतच बोलण्याचा धरला अट्टाहास

मुंबई: शहरात मराठी भाषेच्या वापराबाबत सतत वाद उद्भवत असताना, आता मीरा-भाईंदरमध्येही अशाच प्रकारची घटना समोर आली आहे. छठ पूजेच्या आयोजनासाठी घेतलेल्या मार्गदर्शन बैठकीदरम्यान मराठी भाषेचा अवमान केल्याचा आरोप एका आयपीएस अधिकाऱ्यावर करण्यात आला असून या घटनेमुळे परिसरात चांगलाच तणाव निर्माण झाला आहे.

ही बैठक मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तालयात DCP राहुल चव्हाण यांच्या उपस्थितीत झाली. छठ पूजेच्या सुरक्षेची आणि व्यवस्थापनाची तयारी याबाबत आयोजकांना मार्गदर्शन करण्यासाठी ही बैठक बोलावली होती. बैठकीदरम्यान मराठी एकीकरण समितीचे खजिनदार प्रमोद पार्टे यांनी महाराष्ट्राची अधिकृत भाषा मराठी असल्याचा आग्रह धरत मार्गदर्शन मराठीत द्यावे, अशी नम्र विनंती केली.

मात्र, या विनंतीनंतर DCP चव्हाण यांनी संताप व्यक्त केला आणि मराठीऐवजी हिंदीतच मार्गदर्शन सुरू ठेवले, असा आरोप समितीने केला आहे. प्रमोद पार्टे यांनी सांगितले की, “विनंती केल्यावर अधिकाऱ्यांनी जोरात आवाज चढवत आम्हाला गप्प बसण्यास सांगितले आणि संपूर्ण सूचना हिंदी भाषेतच दिल्या.”

हेही वाचा: Rahul Gandhi On Phaltan Doctor Case : भाजप सरकारचा अमानवीय आणि असंवेदनशील चेहरा समोर, सातारा डॉक्टर प्रकरणी राहुल गांधींचा निशाणा

मराठी एकीकरण समितीने DCP राहुल चव्हाण यांच्या विरोधात पोलीस आयुक्त, मराठी भाषा विभाग तसेच मानवाधिकार आयोगाकडे औपचारिक तक्रार दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे. स्थानिक मराठी संघटनांनीही या प्रकरणात तात्काळ चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याच्या मागण्या जोरदारपणे केल्या आहेत.

या घटनेमुळे उपस्थित मराठी नागरिक आणि संघटनांमध्ये नाराजीचा उद्रेक झाला आहे. महाराष्ट्राचे अधिकृत भाषा धोरण दुर्लक्षित करून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मराठीचा अपमान झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.

या वादामुळे मीरा-भाईंदरमध्ये “मराठीचा सन्मान” हा मुद्दा आणखी पेटला असून, राजकीय आणि सामाजिक स्तरावरही या प्रकरणाकडे बारकाईने पाहिले जात आहे.

हेही वाचा: Jayant Naralikar : 'महाविस्फोट सिद्धांता'ला आव्हान देणाऱ्या जयंत नारळीकरांना मरणोत्तर ‘विज्ञान रत्न’; केंद्र सरकारच्या राष्ट्रीय विज्ञान पुरस्कारांची घोषणा


सम्बन्धित सामग्री