Sunday, July 13, 2025 11:04:58 AM

'हिंदी नकोच', मनसेकडून शाळांना निवेदन; धुळ्यात राज ठाकरे यांच्या आदेशाची अंमलबजावणी

धुळे जिल्ह्यात हिंदी सक्तीविरोधात मनसेने शाळांना निवेदन दिले. राज ठाकरे यांच्या आदेशावर आधारित या मोहिमेत मराठीला डावलू नये, असा आग्रह ठेवण्यात आला. मनसे पदाधिकाऱ्यांनी शाळांना पत्र देऊन शासनाला अभिप्

हिंदी नकोच मनसेकडून शाळांना निवेदन धुळ्यात राज ठाकरे यांच्या आदेशाची अंमलबजावणी

धुळे: इयत्ता पहिलीपासून ते तिसरीपर्यंत सक्तीची भाषा म्हणून 'हिंदी' लागू करण्याच्या निर्णयाला मनसेने तीव्र विरोध दर्शवत कारवाई सुरू केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी मनसेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली धुळ्यातील विविध शाळांमध्ये निवेदन देण्यात आले.

या निवेदनाद्वारे शाळा व्यवस्थापनांना स्पष्टपणे सांगण्यात आले की, 'हिंदी' ही सक्तीची भाषा म्हणून लादणे योग्य नाही आणि मराठी भाषेला डावलणारे हे धोरण राज्यात लागू होता कामा नये. यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी शाळेच्या मुख्याध्यापकांना राज ठाकरे यांनी पाठवलेले खास पत्र देखील सुपूर्त केले. या पत्राचा गांभीर्याने विचार करून आपला स्पष्ट अभिप्राय शासनाला पाठवावा, अशी विनंतीही यावेळी करण्यात आली.

हेही वाचा:कोल्हापुरात पुरुष आणि महिलेकडून स्मशानभूमीत नग्न पूजा

या मोहिमेत राज्य सचिव प्राची कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा सरचिटणीस अजित राजपूत आणि इतर मनसे पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी सांगितले की, मातृभाषा आणि स्थानिक संस्कृतीच्या रक्षणासाठी अशा प्रकारचे निर्णय महत्वाचे आहेत. शिक्षण व्यवस्थेत मराठी भाषेला न्याय मिळालाच पाहिजे, हा आमचा आग्रह राहणार आहे.

हेही वाचा:शरद पवार गटाने मुख्यंत्र्यांना दाखवले काळे झेंडे

या निवेदन मोहिमेमुळे जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रात एक वेगळा चर्चेचा विषय निर्माण झाला असून, पालक आणि शिक्षकवर्गात यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.


सम्बन्धित सामग्री