जून महिना ओसरला तरी अद्याप पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे मुंबईकरांसमोर पाणीकपातीचं संकट आ वासून उभं ठाकलं आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात मान्सूनचा प्रवास रेंगाळला असून मुंबईत विलंबाने मान्सून दाखल होणार आहे. त्यातच मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाणीसाठ्यात कमालीची घट झाल्याचे दिसून येत आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्यासातही धरणांमधील राखीव साठा मिळून पुढील केवळ ४८ दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्लक आहे. जून महिना ओसरला तरी अद्याप पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे मुंबईकरांसमोर पाणीकपातीचं संकट आ वासून उभं ठाकलं आहे.
बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सून पुढे सरकण्यास खंड पडला आहे. दुसरीकडे, अल निनो प्रभावामुळे यंदा पाऊसमान कमी असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. त्यातच पाणीसाठा झपाट्याने आटत असल्याने राज्यातील शेतकऱ्यांसोबतच सर्वसामान्य नागरिक देखील चिंताग्रस्त झाला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील राखीव पाणीसाठा मिळून ४८ दिवस पुरेल इतकाच असल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.
जून महिन्याचा पंधरवडा संपला तरी मान्सून मुंबईत दाखल झालेला नाही. त्यामुळे आणखी १५ दिवस वाट पाहून महापालिका जून अखेरपासून पाणी कपातीचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे येत्या १५ दिवसांत पुरेशा प्रमाणात पाऊस पडला नसल्यास मुंबईकरांना जुलै महिन्यात पाणी कपातीला सामोरे जावे लागणार आहे.