Homeमहाराष्ट्रमुंबई आग्रा महामार्गावर मोठा शस्त्रसाठा जप्त
मुंबई-आग्रा महामार्गावर मोठा शस्त्रसाठा जप्त
जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवड टोलनाक्यावर गुरुवारी रात्री बोलेरो गाडीतून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. पोलिसांच्या कारवाईत चार हजारांपेक्षा जास्त जिवंत काडतुस, 25 रायफल, 17 रिव्हॉलवर आणि दोन विदेशी पिस्तुले जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून तिघेही मुंबईचे असल्याची माहिती मिळतेय.