मुंबईकरांच्या आवडीच्या Kyani & Co वर कारवाई; FDA तपासणीत स्वच्छतेच्या त्रुटी, दुकानाचा परवाना निलंबित

मुंबईतील प्रसिद्ध Kyani and Co वर FDAने कारवाई केली.

मुंबईकरांच्या आवडीच्या Kyani & Co वर कारवाई; FDA तपासणीत स्वच्छतेच्या त्रुटी, दुकानाचा परवाना निलंबित
मुंबईतील प्रसिद्ध Kyani and Co वर FDA ची मोठी कारवाई

मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध खाद्य आस्थापन Kyani and Co वर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. काळबादेवी येथील या आस्थापनाची २७ सप्टेंबर रोजी तपासणी करण्यात आली. या तपासणीदरम्यान अन्न तयार करण्याच्या तसेच साठवणूक करण्याच्या ठिकाणी स्वच्छता आणि अन्न सुरक्षेशी संबंधित गंभीर त्रुटी आढळल्याचा दावा FDAने केला आहे.

FDAच्या माहितीनुसार, तपासणीदरम्यान अन्न तयार करण्याच्या परिसरात मांजर आणि उंदरांची विष्ठा आढळली. तसेच जिवंत माश्या आणि मृत झुरळेही आढळल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. रेफ्रिजरेटरमध्ये मोठ्या प्रमाणात रक्त साचलेले आढळल्याची नोंदही तपासणीदरम्यान करण्यात आली.

हेही वाचा: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर भीषण अपघाताचा थरार! तीन वाहने एकमेकांवर आदळली; चालकाचा मृत्यू, दोघे जखमी

याशिवाय, प्रक्रिया विभागात उघडे सांडपाण्याचे मॅनहोल असल्याचे FDAच्या तपासणीत समोर आले. काही अन्नपदार्थ थेट जमिनीवर ठेवण्यात आल्याचेही आढळले. कच्चे पीठ छापील वर्तमानपत्राने झाकून ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.

कर्मचाऱ्यांकडून आवश्यक स्वच्छता आणि सुरक्षा किट्सचा वापर होत नसल्याचेही FDAने म्हटले आहे. तसेच कच्चे आणि तयार अन्नपदार्थ योग्य पद्धतीने वेगळे ठेवण्यात आले नसल्याची बाब तपासणीत समोर आली.

या सर्व त्रुटींमुळे अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे FDAने नमूद केले आहे. अशा परिस्थितीत तयार होणारे किंवा साठवले जाणारे अन्न ग्राहकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते, असे प्रशासनाच्या कारवाईतून स्पष्ट करण्यात आले.

माळेगाव कारखान्याच्या वार्षिक सभेत मोठा राडा! सभासदांचा गोंधळ, वातावरण तापलं; अखेर सुनेत्रा पवार उठल्या माईक हातात घेतला अन्…

गंभीर स्वच्छता आणि अन्न सुरक्षा त्रुटी आढळल्याच्या पार्श्वभूमीवर FDAने Kyani and Co चा FSSAI परवाना तात्काळ निलंबित केला आहे. तसेच आस्थापनातील अन्नपदार्थांची खरेदी, उत्पादन, प्रक्रिया, साठवणूक, विक्री आणि वितरण तात्काळ बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

FDAच्या या कारवाईनंतर संबंधित आस्थापनाकडून नियमांचे पालन आणि स्वच्छतेच्या बाबतीत आवश्यक सुधारणा केल्या जातात का, याकडे लक्ष लागले आहे. पुढील तपास आणि प्रशासनाच्या प्रक्रियेनंतर या प्रकरणातील पुढील कारवाई स्पष्ट होणार आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number