प्राईम लोकेशनवर कोट्यवधींची घरे स्वस्तात मिळणार! म्हाडाची मोठी संधी, आधी येणाऱ्याला आधी प्राधान्य

Mhada Home : म्हाडाच्या महागड्या घरांसाठी आता नवा पर्याय समोर येणार आहे शिवाय घरांच्या किमती कमी करण्यासह विक्रीच्या पद्धतीतही महत्त्वाचा बदल होण्याची शक्यता आहे.

प्राईम लोकेशनवर कोट्यवधींची घरे स्वस्तात मिळणार! म्हाडाची मोठी संधी, आधी येणाऱ्याला आधी प्राधान्य
Mhada News

मुंबई : मुंबईमध्ये स्वत:चं घर असावं हे प्रत्येकाचे स्वप्न असतं, पण कोट्यवधींच्या किमतीमुळे ते पूर्ण होत नाही. मात्र आता हक्काचे घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाने घरांच्या किमतीमध्ये मोठी कपात करण्याचा निर्णय घेतलेला आहे.

घर खरेदीचं गणित बदलणार
सध्या म्हाडाकडे साधारण 300 ते 400 अशी घरे आहेत, जी दोन-दोन वेळा लॉटरीमध्ये टाकूनही विकली गेली नाहीत. खरं तर खाजगी विकासकांकडून आलेली ही घरे तब्बल कोट्यवधींच्या किमतीत असल्याने त्यांना ग्राहकच मिळत नाही, असे चित्र आहे. त्यामुळे म्हाडाची कोट्यवधी रुपये अडकून पडलेले आहेत.

हेही वाचा – दिवाळीचा आनंद द्विगुणित! परिवहन कर्मचाऱ्यांना घसघशीत बोनस; रक्कम ऐकून व्हाल खुश

म्हाडाच्या घरांसाठी नवी योजना
त्यावर तोडगा म्हणून म्हाडाची ही घरे ‘प्रथम येणाऱ्या प्राधान्य’ या योजनेंतर्गत विकणार आहे. विशेष म्हणजे त्याआधी या घरांच्या किंमती कमी केल्या जाणार आहेत. येत्या काही दिवसात होणाऱ्या प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये यावर अंतिम शिक्कामोबर्त केला जाईल.

घरांच्या किमती किती स्वस्त होणार?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याआधी पाहिलं तर कन्नमवार नगरमध्ये असलेल्या घरांच्या किमती या 7.5 टक्क्यांनी कमी केल्या होत्या. त्याच पद्धतीने याही घरांच्या किमतीमध्ये तब्बल 7 ते 10 टक्क्यांपर्यंत कपात होऊ शकते. त्यासाठी म्हाडा आपला नफा आणि प्रशासकीय खर्च कमी करणार आहे. महत्त्वाचे म्हणजे दिवाळीनंतर या घरांसाठी नवीन जाहिरात निघणार आहे.

महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number