Friday, March 06, 2026 08:14:14 AM

Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर दहा दिवसांचा ब्लॉक, वाहतुकीला बसणार फटका,कोणते मार्ग असतील बंद?

जागेवरील फलक किंवा सूचनांनुसार पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.

samruddhi mahamarg  समृद्धी महामार्गावर दहा दिवसांचा ब्लॉक वाहतुकीला बसणार फटकाकोणते मार्ग असतील बंद

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. या मार्गावर 9 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी या कालावधीत बुलढाणा आणि जालना जिल्ह्यांमध्ये महामार्गावर ब्लॉकची घोषणा करण्यात आली आहे.  या ब्लॉक दरम्यान हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम (HTMS) अंतर्गत गॅन्ट्री उभारण्याचे काम नऊ टप्प्यांत केले जाणार आहे.  मुंबई आणि नागपूर दोन्ही मार्गांवर साधारण एक तासासाठी वाहतूक थांबवण्यात येईल. यामुळे प्रवाशांना तासभर थांबून राहावे लागेल. काम पूर्ण झाल्यावर वाहतूक पुन्हा पूर्ववत केली जाईल.

एमएसआरडीसीने प्रवाशांना प्रवासात एक तासापर्यंत विलंब होण्याची शक्यता लक्षात घेऊन, आपल्या प्रवासाचे निघण्यापूर्वीच नियोजन करण्याचे आणि आवश्यक असल्यास, जागेवरील फलक किंवा सूचनांनुसार पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.

कोणते मार्ग राहणार बंद?
मुंबईकडे जाणारी मार्गिका: दुपारी 12 ते 1, 
नागपूरकडे जाणारी मार्गिका: दुपारी 3 ते 4

10 फेब्रुवारी
किमी 314.250 – मुंबईकडे जाणारी मार्गिका: दुपारी 12 ते 1
किमी 318.500 – मुंबईकडे जाणारी मार्गिका: दुपारी 12ते 1

11 फेब्रुवारी
किमी 318.500 – नागपूरकडे जाणारी मार्गिका: दुपारी 3 ते 4
किमी 329.200 – नागपूरकडे जाणारी मार्गिका: दुपारी 3ते 4


सम्बन्धित सामग्री