दिवाळीपूर्वी सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; चांदी 14 हजारांनी स्वस्त, सोन्याच्या दरातही मोठी घट

अमेरिकेतील व्याजदरांमधील बदल आणि डॉलरच्या मजबुतीचा परिणाम म्हणून सोने-चांदीच्या दरात घसरण होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

दिवाळीपूर्वी सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; चांदी 14 हजारांनी स्वस्त, सोन्याच्या दरातही मोठी घट
Gold Silver Price

दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना सोने-चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. अमेरिकेतील व्याजदरांमधील बदल आणि डॉलरच्या मजबुतीचा परिणाम म्हणून सोने-चांदीच्या दरात घसरण होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

गेल्या दहा दिवसांत सोन्याच्या दरात 4 हजार 500 रुपयांची, तर चांदीच्या दरात तब्बल 14  हजार रुपयांची घसरण झाली आहे. जळगावच्या बाजारात जीएसटीसह सोन्याचे दर 1 लाख 46 हजार रुपये, तर चांदीचे दर 2 लाख 6 हजार रुपयांवर पोहोचले आहेत.

हेही वाचा- छत्रपती संभाजीनगरहून गोव्याला जाणारी विमानसेवा अवघ्या 24 दिवसांत बंद; प्रवाशांसाठी पर्यायी मार्ग खुलासा

दरम्यान, आगामी काळात सोने-चांदीच्या दरात आणखी घसरण होणार का, याकडे ग्राहक आणि गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. लग्नसराई तसेच सणासुदीच्या काळात दागिन्यांची खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी ही दरघसरण महत्त्वाची ठरू शकते.

दरम्यान, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीचे दर आणखी घसरणार का, याकडे ग्राहक आणि सराफा व्यावसायिकांचे लक्ष लागले आहे. दर कमी झाल्यामुळे सणासुदीच्या काळात दागिने खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळू शकतो. या दरघसरणीमागची कारणं काय आहेत? भविष्यात दर आणखी कमी होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number