Sunday, July 13, 2025 10:35:50 AM

नागपूरच्या जुनी कामठीच्या पुलाचंही स्ट्रक्चरल ऑडिट होणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आदेश

नागपूरच्या जुनी कामठीच्या पुलाचंही स्ट्रक्चरल ऑडिट होणार आहे. पुणे कुंडमळा पुलाच्या घटनेनंतर प्रशासन सतर्क झालं आहे.

नागपूरच्या जुनी कामठीच्या पुलाचंही स्ट्रक्चरल ऑडिट होणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आदेश

नागपूर: नागपूरच्या जुनी कामठीच्या पुलाचंही स्ट्रक्चरल ऑडिट होणार आहे. पुणे कुंडमळा पुलाच्या घटनेनंतर प्रशासन सतर्क झालं आहे. राज्यातील जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. 

पुणे जिल्ह्यातील कुंडमळा पुलाच्या घटनेनंतर नागपूर जिल्ह्यातील जुनी कामठीच्या पुलाचंही स्ट्रक्चरल ॲाडीट होणार आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश दिले आहेत. नागपूरमधील जुनी कामठी येथील लोखंडी पूल अनेक वर्ष जुना आहे. मात्र हा पूल सुद्धा धोकादायक असल्याने या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची गरज आहे.

हेही वाचा : छत्रपती संभाजीनगर महापालिकेचा अजब निर्णय; जन्म प्रमाणपत्रासाठी करपावती अनिवार्य

मावळ येथील कुंडमळा पुलाच्या घटनेनंतर नागपूर जिल्ह्यातील जुनी कामठीच्या पुलाचंही होणार स्ट्रक्चरल ॲाडिट करण्यात येणार आहे.  अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून उपमुख्यमंत्री शिंदे यांनी जुन्या झालेल्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच नागपुरातील जुनी कामठी येथे सुद्धा अनेक वर्षापासून लोखंडी पूल आहे. मात्र हा पूल सुद्धा धोकादायक असल्याने या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची गरज आहे. शिवाय जुनी कामठी येथील पुलाचं डागडुजी आणि दुरुस्तीही गरजेची आहे. 

कुंडमळ्यात काय घडलं?
पुण्यातील मावळमध्ये कुंडमळ्यात 30 वर्ष जुना पूल कोसळला असून त्यात चार जणांचा मृत्यू झाला आहे. दुर्घटनेतून 38 जणांना वाचवण्यात एनडीआरएफला यश मिळाले आहे. अंदाजे 5 ते 7 जण वाहून गेल्याची माहिती मिळत आहे. रविवार असल्यानं कुंडमाळा येथे पर्यटकांची गर्दी पाहायला मिळाली. रविवारी दुपारी 3:30 वाजता कुंडमळा येथे इंद्रायणी पूल कोसळला. दुर्घटनेत सुमारे 20 ते 25 जण वाहून गेल्याची माहिती मिळाली. तत्परतेनं एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आलं. एनडीआरएफनं समयसूचकता दाखवत 38 जणांना वाचवलं. तपासात दोन जणांचे मृतदेह मिळाले. शासनाने मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत जाहीर केली आहे. जखमींचा खर्चही शासनानं उचलला. तपास यंत्रणेला स्थानिकांनी मोठं सहकार्य केलं. 


सम्बन्धित सामग्री