मुंबई ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रवास होणार सुसाट! वरळी ते शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूपर्यंत सिग्नलमुक्त प्रवास

शेतकरी विरोध, भूखंड वाटपातील गुंतागुंत आणि इतर प्रशासकीय अडचणींमुळे अनेक वर्षांपासून रखडलेला हा प्रकल्प आता वेगाने पुढे सरकणार असून, यामुळे 'तिसरी मुंबई' महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाचे नवे ग्रोथ इंजिन ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
मुंबई ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रवास होणार सुसाट! वरळी ते शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूपर्यंत सिग्नलमुक्त प्रवास
Devendra Fadnavis

नवी मुंबईतील बहुप्रतिक्षित ‘नैना’ (NAINA) प्रकल्पाला अखेर मोठी गती मिळाली असून, मुंबई ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यानचा प्रवास पूर्णपणे सिग्नलमुक्त (Signal-free) होणार असल्याची अत्यंत महत्त्वाची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. विविध पायाभूत सुविधांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण परिसराचा कायापालट होणार असल्याचे स्पष्ट केले. शेतकरी विरोध, भूखंड वाटपातील गुंतागुंत आणि इतर प्रशासकीय अडचणींमुळे अनेक वर्षांपासून रखडलेला हा प्रकल्प आता वेगाने पुढे सरकणार असून, यामुळे ‘तिसरी मुंबई’ महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाचे नवे ग्रोथ इंजिन ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांना मालमत्ता पत्रकांचे वाटप आणि नव्या पायाभूत सुविधांचे लोकार्पण

दरम्यान, रविवार, 25 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नैना प्रकल्पांतर्गत बाधित शेतकऱ्यांना अधिकृत मालमत्ता पत्रकांचे वाटप करण्यात आले. याच सोहळ्यात परिसरातील महत्त्वाच्या रस्त्यांचे भूमिपूजन आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पूर्व भागाला जोडणाऱ्या उड्डाणपुलांचे उद्घाटन करण्यात आले. विमानतळ उभारणीमुळे या संपूर्ण भागात मोठ्या प्रमाणावर आर्थिक आणि औद्योगिक घडामोडींना चालना मिळणार असून, हा विकास नियोजनबद्ध पद्धतीने व्हावा यासाठीच सिडकोच्या माध्यमातून नैना प्रकल्पाची आखणी करण्यात आली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

वरळी ते अटल सेतूपर्यंत सिग्नलमुक्त प्रवास

वाहतूक व्यवस्थेबाबत माहिती देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, मुंबईतील वरळी ते थेट अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूपर्यंतचा संपूर्ण प्रवास आता विनाअडथळा आणि सिग्नलमुक्त होणार आहे. यामुळे मुंबईकर अवघ्या काही मिनिटांत नवी मुंबई विमानतळ गाठू शकतील. याशिवाय, ठाणे, रायगड, नवी मुंबई आणि पालघर हे संपूर्ण क्षेत्र राज्याच्या प्रगतीत मुख्य भूमिका बजावत आहे.

हेही वाचा –  पुण्याची पुनरावृत्ती! न्यायाधीशाच्या अल्पवयीन मुलाच्या मर्सिडीजची दुचाकीला धडक; एकाचा जागीच मृत्यू

केवळ रस्ते किंवा वाहतूकच नव्हे, तर या भागात एकात्मिक विकास प्रकल्पांच्या माध्यमातून भविष्यात प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पिण्याचे पाणी पोहोचवण्याचे ठोस नियोजन करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या निर्णयामुळे नैना क्षेत्रातील स्थानिक नागरिकांमध्ये आणि विकासकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version