सावळ घाटात खासगी बस पलटली! दोघांचा मृत्यू तर 6 जण जखमी; बसच्या खिडक्या, दरवाजे तोडून…, रात्रीच्या अंधारात नेमकं काय घडलं?

नाशिक-गुजरात महामार्गावरील पेठ करंजाळी-सावळ घाट परिसरात एक खाजगी बस पलटली असून या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे तर पाच ते सहा जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
Nashik Accident
Nashik Accident

नाशिक-गुजरात महामार्गावरील पेठ करंजाळी-सावळ घाट परिसरात एक खाजगी बस पलटली असून या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे तर पाच ते सहा जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रवाशांना घेऊन जाणारी ही खाजगी बस घाटातील वळणावर अचानक पलटी झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांसह बचाव पथक आणि संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. मंगळवारी रात्री 11 ते 11.30 वाजताच्या सुमारास एक खासगी लक्झरी बस नाशिकहून गुजरातच्या दिशेने जात होती. त्यावेळेस करंजाळी-सावळ घाट परिसरात रात्री वळण आणि रस्त्याचा अंदाज न अंदाज आल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले ज्यामुळे बस पलटी होऊन बसचा भीषण अपघात झाला आहे.

हेही वाचा- औषध दिल्यानंतर अचानक नाकातून रक्तस्राव, नवजात बाळाचा मृत्यू; खोपोलीतील हॉस्पिटलमध्ये खळबळ

या अपघातात महेंद्र पाल आणि राहुल ओझा या दोघांचा अपघातात मृत्यू झाला असून हे दोघेही गुजरात राज्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच अपघातात जखमी झालेल्या रुग्णांना तात्काळ दिंडोरी ग्रामीण रुग्णालय आणि नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस, आरोग्य विभागाची टीम आणि तहसीलदार घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी तत्काळ बचाव कार्य तैनात केले. तसेच यावेळी प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी बसच्या खिडक्या, दरवाजे आणि छतावरील एसीचे व्हेंट तोडून मदतकार्य सुरु केले. घाट परिसरातील धोकादायक वळणावर हा अपघात झाल्याने महामार्गावरील वाहतुकीवरही काही काळ परिणाम झाला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version