नाशिकच्या विमानसेवेबाबत मोठी अपडेट! दिल्लीसह 4 शहरांसाठी रोज उड्डाण, पण गोव्याचा पत्ता कट?

Nashik Flight Update : नाशिकच्या ओझर विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. इंडिगोच्या विमानसेवेच्या हिवाळी वेळापत्रकात काही बदल करण्यात आले आहेत. नव्या वेळापत्रकामुळे प्रवाशांना आपल्या प्रवासाचे नियोजन करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागणार आहेत.

नाशिकच्या विमानसेवेबाबत मोठी अपडेट! दिल्लीसह 4 शहरांसाठी रोज उड्डाण, पण गोव्याचा पत्ता कट?
Nashik Flight Update

नव्या विमानसेवेमुळे नाशिक आता देशातील मोठ-मोठ्या शहरांशी जोडले गेले आहे. ओझर या विमानतळाचे हिवाळी वेळापत्रक सध्यााच जाहीर झालेले असून यामध्ये काही मोठे बदलही केले आहे.

इंडिगोच्या नव्या वेळापत्रकानुसार, दिल्ली, बेंगळुरु, हैदराबाद सह अहमदाबाद या चार शहरांसाठी आता दररोज थेट विमानसेवा मिळणार आहे. मात्र, आता नाशिकक ज्या गोवा थेट सेवेची वाट पाहत होते, ती यावर्षीही सुरु होणार नाही. हे नवे वेळापत्रक 25 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे.

हेही वाचा – ठाणे-भिवंडी-कल्याण प्रवास होणार सुसाट! मेट्रो 5 मार्गावर पहिली गाडी दाखल, स्थानके कोणती?

नाशिकहून विमाने कधी सुटणार?
दिल्लीसाठी आता दोन विमाने कायम असणार आहे. सकाळी 9 वाजून 5 मिनिटांनी तर रात्री 9 वाजून 55 मिनिटांनी दिल्ली जाईल. बेंगळुरुची सेवा जी आठवड्यातून चार दिवस होती, ती आज रोज झाली असून दुपारी 4 वाजून 20 मिनिटांनी उड्डाण होईल. हैदराबादसाठी सायंकाळी 5 वाजून 10 मिनिटांनी आणि सायंकाळी 5 वाजता 40 मिनिटांनी विमान सुटेल.

नाशिकमध्ये विमाने कधी येणार?
दिल्लीहून सकाळी 8 वाजून 35 मिनिटांनी तर रात्री 9 वाजून 20 मिनिटांनी विमान येईल. बेंगळुरुहून दुपारी 3 वाजून 50 मिनिटांनी. हैदराबादहून सायंकाळी 4 वाजून 40 मिनिटांनी तर अहमदाबादहून सायंकाळी 5 वाजून 20 मिनिटांनी विमान हे नाशिकमध्ये दाखल होईल. हे वेळापत्रक 25 ऑक्टोबर ते 27 मार्चपर्यंत लागू राहणार आहे.

महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update

 

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number