हजारो कंत्राटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड; आता थेट ‘इतका’ वाढून मिळणार पगार

Navi Mumbai : नवी मुंबई महानगरपालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीपूर्वी आनंदाची बातमी समोर आली आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ
Big Diwali Gift for NMMC Workers

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. यंदाची दिवाळी ही त्यांच्यासाठी गोड होणार आहे. पगारवाढीच्या प्रस्तावाला आता स्थायी समितीने मंजुरी दिलेली आहे. या निर्णयामुळे महापालिकेच्या सुमारे 8 हजार कंत्राटी कामगारांना मोठा दिलासा मिळणार आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याच्या पगाराता आता तब्बल 7 हजार 800 रुपयांची वाढ होईल.

मिळालेल्या माहितीनुसार, साडेसात हजार रुपयांची वाढ ही प्रत्यक्ष हातात मिळणार आहे. यामधून पीएफ आणि इतर असलेल्या कपाती वजा होतील. तर उर्वरित रक्कम ही कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होईल. विशेष म्हणजे ही पगारवाढ मागील जुलै महिन्यापासूनच्या थकबाकीसह दिली जाणार आहे. त्यामुळेच दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांच्या हातात चांगली रक्कम येणार असून यंदाच्या सणाचा आनंद द्विगुणित होईल.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version